-
प्रतिनिधी
अभिनेता टायगर श्रॉफच्या (Tiger Shroff) हत्येची सुपारी दिल्याची माहिती मुंबई पोलीस नियंत्रण कक्षाला देणाऱ्याला पंजाबमधून अटक करण्यात आली आहे. मनीष कुमार सुजिंदर सिंग (३५) असे या आरोपीचे नाव आहे. तो सुरक्षा रक्षक म्हणून काम करत होता. पोलिस अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, कामावरून वारंवार गैरहजर राहिल्यामुळे त्याचा पगार कापला जात असल्याने तो नाराज होता. रागाच्या भरात त्याने कंपनीतील वरिष्ठसोबत सूड घेण्यासाठी आणि कंपनीची प्रतिष्ठा खराब करण्यासाठी खोटा बनाव रचला होता.
(हेही वाचा – Cabinet Decision : मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय वाचा एका क्लिकवर)
मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला सोमवारी धमकीचा फोन आला होता. प्राथमिक तपासादरम्यान असे आढळून आले की, सिंगने ‘ट्रिग’ सिक्युरिटी सर्व्हिसेसच्या शाखा प्रमुख आणि क्षेत्रीय अधिकाऱ्याने टायगर श्रॉफ (Tiger Shroff) याच्या हत्येची सुपारी दिली आहे. त्यांनी पैसे आणि शस्त्रे पुरवल्याचा खोटा दावा फोनवर केला होता. खार पोलिसांनी मनीष कुमार सिंगविरुद्ध चुकीची माहिती पसरवल्याबद्दल आणि जनतेत द्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याबद्दल आयपीसी कलम ३५३(२), २१२ आणि २१७ अंतर्गत गुन्हा दाखल केला. त्यानंतर, पोलिसांच्या एका पथकाने त्याचा पंजाबमध्ये शोध घेतला आणि त्याला ताब्यात घेतले असून त्याला मुंबईत आणण्यात येत आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community