शासनाचा ७ कोटींचा महसूल बुडवणाऱ्याला बेड्या

111

बनावट देयकांच्या माध्यमातून शासनाचा ७ कोटींचा महसूल बुडवणाऱ्या एका व्यापाऱ्याला महाराष्ट्र वस्तू व सेवा कर विभागाने बेड्या ठोकल्या आहेत. जगदीश जगन्नाथ पाटील (वय ४८) असे आरोपीचे नाव आहे.

( हेही वाचा : मुंबई-सिंधुदुर्ग सागरी महामार्गाला मिळणार गती; एशियन डेव्हलपमेंट बँक करणार अर्थसहाय्य)

मे. अर्णव क्रिएशन या व्यापाऱ्याचे दोन मोठे पुरवठादार मे. हेना इंटरप्रायझेस व मे. एक्सकर्सी ओव्हरसिज हे करदाते अस्तित्वात नसून बोगस आहेत. त्यांनी बनावट कागदपत्रे वापरून फसव्या पद्धतीने नोंदणी केली आहे. या करदात्यांकडून संबंधित व्यापाऱ्याने ७.०८ कोटींची बनावट वजावट (इनपुट टॅक्स क्रेडिट) मिळवली, असे तपासादरम्यान आढळून आले.

या प्रकरणी मुंबई महानगर दंडाधिकारी न्यायालयाने जगदीश पाटील याला १७ नोव्हेंबर २०२२ पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. २०२२-२३ मध्ये खोटी देयके देऊन, तसेच कोणत्याही वस्तू व सेवांचा प्रत्यक्ष पुरवठा न करता, खोटे व्यवहार, विवरणपत्रात नमूद करून करचोरी करणाऱ्या, तसेच पुढील खरेदीदार व्यापाऱ्यांना खोटी कर वजावट (इनपुट टॅक्स क्रेडिट) हस्तांतरित करणाऱ्या व्यापाऱ्यांवर अंकुश ठेवणे व अशा व्यवहारास प्रतिबंध घालण्यासाठी या मोहिमेअंतर्गत आतापर्यंतची ही ४९ वी अटक आहे, अशी माहिती वस्तू व सेवा कर विभागाचे राज्यकर आयुक्त प्रकाश शेळके यांनी दिली.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.