Madhya Pradesh: बस उलटून २१ सुरक्षारक्षक जखमी, निवडणुकीच्या बंदोबस्तातून परतताना झाला अपघात

यासंदर्भातील माहितीनुसार छिंदवाडा येथून ड्युटी संपवून सैनिकांनी भरलेली बस बरेठा घाटावर आली तेव्हा ओव्हरटेक करताना समोरून येणाऱ्या बसला धडकली.

105
Accident: आग्रा-चांदवड मार्गावर भीषण अपघात, अनेक जण जखमी; ५ जणांचा मृत्यू

मध्य प्रदेशात निवडणूक बंदोबस्ताचे काम आटोपून परतणाऱ्या बसचा आज, शनिवारी पहाटे नागपूर-भोपाळ महामार्गावरील (Nagpur-Bhopal highway) बरेठा घाटात अपघात झाला. होमगार्ड आणि पोलिस कर्मचाऱ्यांना घेऊन ही बस परतत असताना पहाटे ४ वाजता हा अपघात झाला. यामध्ये २१ सुरक्षारक्षक जखमी झाले आहेत. (Madhya Pradesh)

यासंदर्भातील माहितीनुसार छिंदवाडा येथून ड्युटी संपवून सैनिकांनी भरलेली बस बरेठा घाटावर आली तेव्हा ओव्हरटेक करताना समोरून येणाऱ्या बसला धडकली. धडकेनंतर बस रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्ड्यात उलटली. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलीस ताफा घटनास्थळी पोहोचला आणि जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. बैतुलच्या एसडीओपी शालिनी परस्ते यांनी सांगितले की, हा अपघात शाहपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत झाला. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

(हेही वाचा – Suzuki GSX-8S : सुझुकीची ट्विन सिलिंडर असलेली नेकेड बाईक पाहिलीत का? )

अपघाताचा तपास करण्यात येत आहे. छिंदवाडाहून राजगढला जाणाऱ्या या बसमध्ये ४० जण होते, ज्यात ३४ होमगार्ड शिपाई आणि ६ पोलीस होते. अपघातात २१ जण जखमी झाले असून १२ जणांना किरकोळ जखमींना आरोग्य केंद्र शाहपूर येथे दाखल करण्यात आले असून ९ गंभीर जखमी जवानांना जिल्हा रुग्णालयात बैतुल येथे दाखल करण्यात आले आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.