Lok Sabha Election 2024: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पिंपरीतील ३० जणांवर ‘मोक्का’

भोसरीमधील टोळी प्रमुख पवन छगन उजगरे, सुनील जनार्दन सकट (३२), दीपक रामकिसन हजारे (२७) या टोळीवर नुकताच शस्त्राच्या धाकाने जबरी चोरी केल्याबद्दल गुन्हा दाखल आहे.

105
Lok Sabha Election 2024: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पिंपरीतील ३० जणांवर 'मोक्का'

भोसरीमधील उजगरे आणि वाकडमधील आहिरराव टोळ्यांवर पिंपरी-चिंचवड पोलिसांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (Maharashtra Control of Organized Crime Act) (मोक्का) कारवाई केली आहे. लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी मागील अडीच महिन्यात सहा गुन्हेगारी टोळीतील ३० आरोपींवर मोक्काअंतर्गत कारवाई केली आहे. (Lok Sabha Election 2024)

भोसरीमधील टोळी प्रमुख पवन छगन उजगरे, सुनील जनार्दन सकट (३२), दीपक रामकिसन हजारे (२७) या टोळीवर नुकताच शस्त्राच्या धाकाने जबरी चोरी केल्याबद्दल गुन्हा दाखल आहे. या टोळीवर ६ गुन्हे दाखल आहेत. वाकड मधील टोळी प्रमुख आदित्य ऊर्फ निरंजन शाम आहिरराव (३१, रा. तापकीरनगर, काळेवाडी), प्रतीक अशोक माने (२०), प्रेम संदीप तरडे (१९) या टोळीवर एकूण दहा गुन्हे दाखल आहेत.

(हेही वाचा – Baramati Lok Sabha Constituency : विजय शिवतारेंच्या विरोधाचा अजित पवारांना बसणार फटका; काय आहेत त्यामागील कारणे? )

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.