Kedarnath Helicopter Crash: केदारनाथच्या जंगलात हेलिकॉप्टर कोसळले ; ७ जणांचा मृत्यू !

Kedarnath Helicopter Crash: केदारनाथच्या जंगलात हेलिकॉप्टर कोसळले ; ७ जणांचा मृत्यू !

249
Kedarnath Helicopter Crash: केदारनाथच्या जंगलात हेलिकॉप्टर कोसळले ; ७ जणांचा मृत्यू !
Kedarnath Helicopter Crash: केदारनाथच्या जंगलात हेलिकॉप्टर कोसळले ; ७ जणांचा मृत्यू !

केदारनाथधामकडे (Kedarnath Helicopter Crash) जाणाऱ्या आर्यन एव्हिएशनच्या हेलिकॉप्टरचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात ७ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळते आहे, तर या हेलिकॉप्टरमध्ये एकूण ७ प्रवासी होते. हे हेलिकॉप्टर गुप्तकाशीहून केदारनाथकडे जात असताना गौरीकुंड आणि त्रिजुगी नारायण यांच्या दरम्यानच्या जंगलामध्ये क्रॅश झाले. (Kedarnath Helicopter Crash)

अपघातानंतर रेस्क्यू पथक तातडीने घटनास्थळी रवाना झाले असून बचावकार्य सुरू आहे. या अपघाताचे मुख्य कारण खराब हवामान असल्याचे प्राथमिक तपासात समोर येत आहे. गौरीकुंड-सोनप्रयाग परिसरात दाट धुके आणि अवकाळी पावसामुळे दृश्यता कमी झाली होती. यामुळे हेलिकॉप्टरने नियंत्रण गमावून जंगलात कोसळल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येतो आहे. (Kedarnath Helicopter Crash)

अधिकृत मृतांची संख्या आणि इतर तपशील लवकरच प्रशासनाकडून जाहीर केला जाणार आहे. उत्तराखंडचे एडीजी कायदा आणि सुव्यवस्था डॉ. व्ही. मुरुगेशन यांनी घटनेबाबत माहिती देताना सांगितलं की, गौरीकुंडमध्ये बेपत्ता झालेले हेलिकॉप्टर कोसळले आहे. अपघातग्रस्त हेलिकॉप्टरमध्ये (Kedarnath Helicopter Crash) ७ जण होते. अधिक माहितीची प्रतीक्षा आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी 5:17 वाजता आर्यन कंपनीचे हेलिकॉप्टर केदारनाथ हेलिपॅडवरून गुप्तकाशी हेलिपॅडकडे ७ भाविकांना घेऊन निघाले. वाटेत खराब हवामानामुळे, हेलिकॉप्टर दुसऱ्या ठिकाणी कठीण लँडिंगला गेले त्यामुळे दुर्घटना झाली आहे. (Kedarnath Helicopter Crash)

सहा प्रवाशांची नावे (Kedarnath Helicopter Crash)

राजवीर-वैमानिक
विक्रम रावत बीकेटीसी रहिवासी रासी उखीमठ
विनोद
तृष्टि सिंह
राजकुमार
श्रद्धा
राशि

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.