Jyoti Malhotra Spy : भारतीय तपास यंत्रणांकडून अटकेत असलेली ज्योती मल्होत्राचं नवं कनेक्शन समोर आले आहे. ज्योती मल्होत्रा(Jyoti Malhotra Spy) आणि मोहम्मद कासिम यांचं कनेक्शन समोर आले असून दोघेही पाकिस्तानी संघटना आयएसआय एजंट एहसान-उर-रहमान उर्फ दानिशच्या संपर्कात होते. दरम्यान, राजस्थानमधील भरतपूर जिल्ह्यातील डीग येथून पाकिस्तानी गुप्तहेर मोहम्मद कासिमला अटक करण्यात आली. या अटकेनंतर नवनवे धागेदोरे समोर येत आहेत.(Jyoti Malhotra Spy)
दरम्यान, मोहम्मद कासिम हा पाकिस्तानी दूतावासातील आयएसआय एजंट एहसान-उर-रहमान उर्फ दानिशच्या संपर्कात होता. हाच दानिश हेर ज्योती मल्होत्राच्या संपर्कात असल्याची माहिती मिळाली आहे. हेरगिरीच्या माध्यमातून दोघेही दानिशला सैन्याशी संबंधित माहिती देत असत. तसेच, मोहम्मद कासिमने दोनवेळी पाकिस्तानला भेट दिली होती. कासिमवर आयएसआयसाठी हेरगिरी, भारतीय लष्कराच्या तळांची माहिती देण्याचा आणि भारतीय सिम कार्ड पाकिस्तानला पाठविण्याचा आरोप आहे.
(हेही वाचा Shri Shaneshwar Devasthan Shanishingnapur मध्ये ११८ मुसलमानांची नियुक्ती रद्द करण्याची मंदिर महासंघाची मागणी )
एकंदरीत, ज्योती मल्होत्रा(Jyoti Malhotra Spy) आणि मोहम्मद कासिम हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. हे दोघेही भारतातून हाकलण्यात आलेल्या दानिशच्या सूचनेनुसार काम करत होते कासिमचा मोठा भाऊ हसी हा जुना पाकिस्तानी एजंट असून त्याने पाकिस्तानात प्रशिक्षण घेतल्याचे उघड झाले आहे. त्यानंतर त्याने धाकटा भाऊ कासिमला प्रशिक्षणासाठी पाकिस्तानला पाठविले होते.
पाकिस्तानात जाऊन घेतले हेरगिरीचे प्रशिक्षण
मोहम्मद कासिम ऑगस्ट २०२४ आणि मार्च २०२५ मध्ये दोनदा पाकिस्तानला गेल्याचे तपासात आढळून आले आहे. पाकिस्तानात त्याने लाहोरमधील एका लष्करी तळावर आयएसआयकडून हेरगिरीचे प्रशिक्षण घेतले. सुमारे ९० दिवस तो पाकिस्तानात राहिला. आणि तिथे ‘शाह जी’, ‘ताऊ जी’ आणि वकास सारख्या आयएसआयच्या हँडलर्सना भेटल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. तपासात असे दिसून आले की, कासिमने पाकिस्तानला भारतीय सिमकार्ड पाठवले होते. या सिमकार्डचा वापर पाकिस्तानी हेरांनी व्हॉट्सअॅपद्वारे भारतीय लोकांशी संपर्क साधण्यासाठी आणि सैन्य आणि सरकारची गोपनीय माहिती गोळा करण्यासाठी केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.
ऑपरेशन सिंदूर दरम्यान अटक
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय सैन्यदलाने केलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’ दरम्यान कासीमला अटक करण्यात आली. या कारवाईदरम्यान देशभरात अनेक हेरगिरी नेटवर्क उघडकीस आले. आतापर्यंत हरियाणा, पंजाब आणि उत्तर प्रदेशातील हेर ज्योती मल्होत्रा(Jyoti Malhotra Spy)सह ११ जणांना पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे.(Jyoti Malhotra Spy)
Join Our WhatsApp Community