भारतातील संवेदनशील माहिती पाकिस्तानला पुरविणाऱ्या ज्योती मल्होत्रा(Jyoti Malhotra) आणि आयएसआय एजंट यांच्याती चॅट्स समोर आले आहे. भारतीय सैन्यदलाने ‘ऑपरेशन सिंदूर’बाबतची माहिती पाकिस्तानला पुरविणाऱ्या भारतातील ११ हेरांना अटक करण्यात आली आहे. यातील युट्युबर ज्योती मल्होत्रा(Jyoti Malhotra)बाबत नवीन धक्कादायक खुलासे समोर आले असून तिची डायरीतून खळबळजनक माहितीदेखील तपासयंत्रणाच्या हाती लागली आहे.
(हेही वाचा Operation Sindoor Delegation : केंद्राच्या शिष्टमंडळाला ठाकरे गटाचा जाहीर पाठिंबा; पक्षाचा संजय राऊतांना घरचा आहेर )
हरयाणात अटक करण्यात आलेल्या ज्योती मल्होत्रा भारतातील गुप्तचरांची माहिती उघड करण्याचे काम करत असल्याचे उघड झाले आहे. पाकिस्तानी गुप्तचर संघटने(आयएसआय)चा एजंट अली हसन आणि ज्योती मल्होत्रा(Jyoti Malhotra) यांच्यातील व्हॉट्सअॅप चॅट व्हायरल झाले आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, दोघांमध्ये सातत्याने कोड वर्डमध्ये वार्तालाप सुरू असल्याचे तपासातून निष्पन्न झाले. यात संशयास्पद हालचालींबाबत उल्लेख केल्याचे आढळून आले आहे.
ज्योती मल्होत्रा(Jyoti Malhotra)ने पाकिस्तानी एजंटला अटारी बॉर्डरची गुप्त माहिती
ज्योती मल्होत्राने पाकिस्तानी एजंटला अटारी सीमेबाबत गुप्त माहिती दिल्याचे तपासात उघडकीस आले आहे. दोघांमधील चॅटद्वारे असे समोर आले आहे की, एजंट अली हसनने ज्योतीला भारत-पाकिस्तान यांच्यातील अटारी सीमेवरील भेटीबद्दल अनेक संवेदनशील प्रश्न विचारले. सीमेवरील प्रोटोकॉलबाबत माहिती जाणून घेण्यासाठी एजंट अलीने ज्योतीला थेट विचारले की, तुम्ही अटारीला गेलात तेव्हा तिथे कोणाला प्रोटोकॉल मिळाला? यावर ज्योती म्हणाली, कोणाला मिळाला, मला मिळाला नाही.
एंजट अली हसन आणि ज्योती मल्होत्रा यांच्यातील संभाषण पुढीलप्रमाणे : –
अली हसन : जेव्हा तुम्ही अटारीला गेलात, तेव्हा तिथे कोणाला प्रोटोकॉल मिळाला होता?
ज्योती : कोणाला मिळाला? मला मिळाला नाही.
अली हसन : म्हणजे कुणी अंडर कव्हर व्यक्ती जसं की, त्याच्याकडे पाहून ओळखता येतं, तुम्ही त्याला बाहेर काढायचे होते किंवा त्याला आत आणायचे होते. माझा विषय आहे, तुम्ही त्याला गुरुद्वारात आणायला हवे होते, दोघांनाही खोलीत बसवायला हवे होते. आता तेच करा.
ज्योती: नाही, इतके मूर्ख थोडीच होते ते..
ज्योती मल्होत्राच्या डायरीतून धक्कादायक खुलासे समोर
पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या युट्यूबर ज्योती मल्होत्राच्या डायरीतून अनेक खुलासे समोर येण्याची शक्यता आहे. तिच्या डायरीतून ज्योतीचा कल पाकिस्तानकडे असल्याचे उघड झाले. २०१२ सालचे कॅलेंडर असलेल्या या जुन्या डायरीच्या पानांवर ज्योतीने पाकिस्तानच्या प्रवासादरम्यान मी गोळा केलेली माहिती, सहलीला जाण्यापासून ते परत येईपर्यंतचे अनुभव, या डायरीत शेअर केले आहेत.
ज्योतीने तिच्या डायरीत लिहिले आहे की, “पाकिस्तानमधून १० दिवसांच्या प्रवासानंतर आज मी माझ्या देशात भारतात परतली आहे. या काळात मला पाकिस्तानातील लोकांकडून खूप प्रेम मिळाले. आमचे सदस्य आणि मित्रही आम्हाला भेटायला आले. लाहोरला भेट देण्यासाठी मला मिळालेले दोन दिवस खूप कमी होते.” असे ज्योती(Jyoti Malhotra)ने आपल्या डायरीमध्ये लिहिले आहे.(Jyoti Malhotra)
Join Our WhatsApp Community