Jammu Kashmir Terrorist Attack: पहलगाम हल्ल्यात पाकिस्तान कनेक्शन! दहशतवाद्यांनी अंदाधुंद केलेल्या गोळीबारात २ जणांचा मृत्यू, अनेक जखमी

215
Pahalgam Terrorist Attack : काश्मीरमध्ये अडकलेल्या पर्यटकांसाठी हेल्पलाइन; मृतदेह मुंबईत आणणार
Jammu Kashmir Terrorist Attack: जम्मू आणि काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाममध्ये (Pahalgam Terror Attack) काही दहशतवाद्यांनी पर्यटकांवर हल्ला केला आहे. पोलिसांच्या गणवेशात आलेल्या २ ते ३ हल्लेखोरांनी हा हल्ला केला. याच दहशतवाद्यांनी पर्यटकांना लक्ष्य केले आणि त्यांच्यावर गोळीबार सुरू केला. ज्यामध्ये दोन जणांचा मृत्यू झाला आणि अनेक जण जखमी झाले. पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर, सीआरपीएफची अतिरिक्त कुमक घटनास्थळी तैनात करण्यात आली आहे. (Jammu Kashmir Terrorist Attack)
मिळालेल्या माहितीनुसार, या हल्ल्यात पाकिस्तानचा हात आहे. या दहशतवादी घटनेत टीआरएफ (The Resistance Front) संघटना सहभागी असण्याची शक्यता आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पहलगामच्या बैसरन खोऱ्यात गोळीबाराचे आवाज ऐकू आले. यावेळी बैसरन गवताळ प्रदेशात घोडेस्वारीचा आनंद घेत असलेल्या पर्यटकांवर हल्लेखोरांनी अंदाधुंद गोळीबार केला.

(हेही वाचा – हिंदू नेत्याची निर्घृण हत्या करणाऱ्या Atikur Islam च्या विरोधात ४ दिवसांनंतर गुन्हा दाखल)

जखमींना हेलिकॉप्टरने बाहेर काढले जात आहे
जखमींना बाहेर काढण्यासाठी हेलिकॉप्टर तैनात करण्यात आले आहे. काही जखमींना स्थानिक लोकांनी त्यांच्या खेचरांवर बसवून खाली आणले. तर १२ जखमी पर्यटकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर या सर्वांची प्रकृती स्थिर आहे. ही घटना अशा वेळी घडली जेव्हा काश्मीरमध्ये वर्षानुवर्षे दहशतवादाशी (Terrorism) झुंजल्यानंतर पर्यटकांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.