Maulana Abdul Aziz Isar : पाकिस्तानमध्ये दहशतवादाचा चेहरा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जैश-ए-मोहम्मदचा वरिष्ठ कमांडर मौलाना अब्दुल अजीज इसार (Maulana Abdul Aziz Isar Death) याचा मृत्यू झाला आहे. या गूढ मृत्यूमुळे गुप्तचर वर्तुळांपासून ते दहशतवादी नेटवर्कपर्यंत खळबळ उडाली आहे. अब्दुल अजीज इसार हा पंजाब प्रांतातील भाक्कर जिल्ह्यातील कल्लूर कोट परिसरातील अशरफवाला येथील रहिवासी होता आणि जैशच्या उच्च नेतृत्वात सहभागी होता. तो बराच काळ भारतविरोधी कारवाईमध्ये सहभागी असायचा तसेच अनेक दहशतवादी हल्ल्यांचा (Terrorist attacks) सूत्रधार देखील मानला जात होता. जैश-ए- मोहम्मदचा (Jaish-e-Mohammed) सिनियर कमांडर मौलाना अब्दुल अजीज इसर याचा रहस्यमयरीत्या गूढ मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे पाकिस्तानात खळबळ उडाली आहे. (Maulana Abdul Aziz Isar)
(हेही वाचा – Thane Water Shortage: ठाणेकरांनो बातमी तुमच्यासाठी; ‘या’ कारणामुळे बुधवारी पाणीपुरवठा राहणार बंद)
जैश-ए-मोहम्मदच्या या कुख्यात दहशतवाद्याने भारताविरुद्ध विष ओकले होते. पण याचा मृत्यू कसा झाला हे अजूनही गूढ आहे. तो पाकिस्तानातील बहावलपूरमध्ये मृतावस्थेत आढळला, जिथे जैशचे मुख्यालय देखील आहे. दहशतवादी संघटनेशी संबंधित सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, त्याचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या मृत्यूचे कारण अद्याप अधिकृतपणे समोर आलेले नाही. तो बराच काळ भारतविरोधी कारवाईमध्ये सहभागी असायचा तसेच अनेक दहशतवादी हल्ल्यांचा सूत्रधार देखील मानला जात होता.
मिळालेल्या माहितीनुसार, जैशचे मुख्यालय असलेल्या बहावलपूरमधील (Jaish Headquarters Bahawalpur) ‘मरकझ’ येथे त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. तसेच दहशतवादी संघटनेचे इतर वरिष्ठ नेते आणि कट्टर समर्थक तेथे उपस्थित राहण्याची शक्यता आहे. मौलाना अझीझ याचा मृत्यू जैशसाठी मोठा धक्का मानला जात आहे, कारण तो संघटनेच्या विचारसरणी आणि दहशतवादी भरती मोहिमेचा एक महत्त्वाचा चेहरा होता. अब्दुल अजीज हा तोच दहशतवादी होता ज्याने गेल्या महिन्यात जैशच्या रॅलीत भारताविरुद्ध गरळ ओकली होटी. तसेच त्याने व्यासपीठावरून भारताला धमकी दिली होती.
(हेही वाचा – biomedical engineer ला सर्वात जास्त किती salary मिळते? पैसा ही पैसा…)
अब्दुल अजीजच्या मृत्यूवर जैश आणि पाकिस्तान सरकारने मौन बाळगले आहे. जैशशी संबंधित सोशल मीडिया अकाउंटने त्याच्या मृत्यूची आणि अंत्यसंस्काराची पुष्टी केली आहे, परंतु मृत्यूच्या कारणाबद्दल माहिती दिलेली नाही. अब्दुल अजीज जैश-ए-मोहम्मदच्या पंजाब प्रांतात आणि विशेषतः बहावलपूर, रावळपिंडीसारख्या भागात तरुणांना भारताविरुद्ध कट्टरतावादी बनवत आणि भडकावत असे. त्याचा मृत्यू जैशसाठी, विशेषतः स्थानिक भरती आणि ब्रेनवॉशिंग नेटवर्कसाठी मोठा धक्का आहे.
हेही पहा –