IRCTC Ticket चा आरक्षण घोटाळा आला उघडकीस, २.५ कोटी बनावट यूजर आयडी केले ब्लॉक

191
भारतीय रेल्वेमध्ये लांबच्या प्रवासासाठी ६० दिवस अगोदरच आरक्षण करण्याची सुविधा उपलब्ध आहे. मात्र तुम्ही केव्हा आयआरसीटीसी वेब साईट उघडून रेल्वेचे तिकीट आरक्षित करण्याचा प्रयत्न केला आहे का? आणि केलं असलं तरी काही मिनिटांतच सर्व तिकीट संपल्याचे तुम्हाला आढळले असेल. यात तुम्ही एकटे नाही आहात. एका इंग्रजी बातमीच्या माहितीनुसार, आयआरसीटीसीने भारतातील प्रवाशांना त्रास देणाऱ्या या प्रकरणामागील एक मोठा घोटाळा उघड केला आहे. तर या कारवाई अंतर्गत २.५ कोटी बनावट युजर आयडी ब्लॉक (irctc 2.5cr user ID block) केले आहेत. (IRCTC Ticket)

(हेही वाचा – घुसखोरी विरोधात BSF ने उचलली कठोर पावले ! DRDO ची मदत घेणार)

मिळालेल्या माहितीनुसार, जानेवारी ते मे २०२५ दरम्यान, आयआरसीटीसीने आरक्षण साईट उघडल्यानंतर अवघ्या पाच मिनिटांत २.९ लाख संशयास्पद तिकिट बुकिंग झाले. यावेळी आयआरसीटीसीने यांची माहिती घेतली असता, हे नियमित प्रवासी नव्हते तर स्वयंचलित साधने आणि बनावट वापरकर्ता खात्यांचा वापर करून तिकिट आरक्षित केल्याचे उघडकीस आले. हे बनावट एजंट मोठ्या संख्येने तिकिटे बुक करायचे आणि नंतर ती प्रवाशांना जादा किमतीत तिकीट विकायचे, तसेच रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले की, ही समस्या विशेषतः जास्त मागणी असलेल्या मार्गांवर आणि गर्दीच्या प्रवासाच्या हंगामात अधिक  होत असे.

वरिष्ठ रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले की, जानेवारी ते मे दरम्यान तिकीट बुकिंगसाठी २.५ कोटी बनावट यूजर आयडी ब्लॉक केले आहेत. तसेच २० लाख यूजर आयडी पुनः तपासणीसाठी ठेवण्यात आले आहेत. हे सर्व एका विशेष मोहिमेअंतर्गत करण्यात आले. रेल्वेच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, ‘नॅशनल सायबर क्राइम पोर्टलवर १३४ तक्रारी नोंदवण्यात आल्या आहेत. तसेच ६,८०० हून अधिक डिस्पोजेबल ईमेल डोमेन ब्लॉक करण्यात आले आहेत. ही मोहीम आणखी तीव्र केली जाईल. असे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले.

(हेही वाचा – राज्यातील ९ लाख महिला घेत आहेत Government Schemes चा बेकायदेशीर लाभ)

सुधारण्यासाठी अनेक पावले उचलली
रेल्वे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, आयआरसीटीसीने आरक्षण प्रणाली सुधारण्यासाठी अनेक पावले उचलली आहेत. यामध्ये आघाडीच्या कंटेंट डिलिव्हरी नेटवर्क्स आणि अँटी-बीओटी अॅप्लिकेशन्सचा वापर समाविष्ट आहे. अँटी-बीओटी अॅप्लिकेशन्स ही एक प्रकारची सुरक्षा तंत्रज्ञान आहे. तिकीट बुक करणारी व्यक्ती मानव आहे की संगणक प्रोग्राम (चॅटबॉट) आहे हे ओळखण्यासाठी याचा वापर केला जातो. यामुळे खऱ्या प्रवाशांसाठी बुकिंग प्रक्रिया सोपी होते.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.