Cyber ​​Crime : सायबर गुन्हेगारांना बँक खाते पुरवणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीचा पर्दाफाश

55
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यानंतर भारतावर १० लाखांहून अधिक सायबर हल्ले; पाकिस्तानसह 'या' देशांचाही समावेश
  • प्रतिनिधी 

भारतीय नागरिकांच्या कागदपत्राना घेऊन धक्कादायक माहिती समोर आली आहे. भारतीय नागरिकांच्या कागपत्रांच्या आधारे बँक खाते उघडून हे बँक खाते परदेशात बसलेल्या सायबर गुन्हेगारी टोळ्यांना पुरवले जात असल्याची बाब समोर आली आहे. मालाडमध्ये राहणाऱ्या एका विद्यार्थ्यांनीच्या बँक खात्यावर ३७ कोटींच्या व्यवहाराबाबत आयकर विभागाने पाठवलेल्या नोटीसनंतर मालवणी पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या तक्रारी वरून पोलिसांनी कांदिवली आणि बोरिवली येथून दोन जणांना अटक केली आहे. हे दोघे प्लेसमेंट एजन्सी चालवत होते आणि त्यांच्याकडे जमा होणाऱ्या कागदपत्रांच्या आधारे बँक खाते तयार करून या खात्याची माहिती, धनादेश, डेबिड कार्ड परदेशात सायबर गुन्हेगारी टोळ्यांना पुरवत होते अशी बाब समोर आली आहे. (Cyber ​​Crime)

(हेही वाचा – Organ Donation ला नवीन दिशा; गरजू रुग्णांना नवजीवन देण्याचा संकल्प)

बोरिवली येथे राहणारा अभिषेक पांडे (२१) आणि कांदिवली पूर्व येथील आकाश विश्वकर्मा (२२) असे अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. या दोघांवर सायबर गुन्हेगार टोळ्यांना “बँक खाते पुरवठादार” म्हणून काम केल्याचा आरोप आहे. नोकरीच्या ऑफरच्या बहाण्याने तरुणांकडून ओळखपत्रे, तसेच छायाचित्रे आणि इतर कागदपत्रे घेऊन पांडे आणि विश्वकर्मा यांनी बनावट ओळखपत्रे वापरून अनेक बँक खाती उघडली आणि हे बँक खाते सायबर टोळ्यांना पुरवली असे अधिकाऱ्याने सांगितले. परदेशातील सायबर टोळ्यांनी या बँक खात्याचा वापर सायबर फसवणुकीचा पैसा जमा करण्यासाठी वापरले असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. (Cyber ​​Crime)

(हेही वाचा – Pahalagam Attack वरून पाकिस्तान खूश झाला आहे का? उच्चायुक्तालयात एक कर्मचारी केक घेऊन जाताना दिसला)

त्यापैकी बरेच जण परदेशातून बँकखाती वापरत असल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी या छाप्या दरम्यान लॅपटॉप, सिम कार्ड, पासबुक आणि शेकडो डेबिट आणि क्रेडिट कार्ड जप्त करण्यात आले. तपास अधिकारी यांच्या म्हणण्यानुसार अटक केलेल्या आरोपीना केवळ एका विद्यार्थ्यांनीचा गैरफायदा घेतला नसून अनेकांची त्यांनी फसवणूक केली आहे. पोलीस अधिकाऱ्यांनी ११५ बँक पासबुक, २७१ डेबिट आणि क्रेडिट कार्ड, २०४ सिम कार्ड आणि ८०,००० रुपयांची रोख रक्कम जप्त केली. भारतीय न्याय संहिता, २०२३ च्या कलम ३१८(४) (फसवणूक) आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या संबंधित कलमांखाली, ज्यामध्ये ६६सी (ओळख चोरी) आणि ६६डी (व्यक्तिरूपाने फसवणूक) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Cyber ​​Crime)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.