Jyoti Malhotra : युट्यूबर ज्योती मल्होत्राच्या अटकेनंतर देशभरात खळबळ उडाली आहे. ज्योती मल्होत्राला पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आले आहे. त्यानंतर केंद्रीय गुप्तचर तपास यंत्रणेने सगळीकडे झाडाझडती करण्यास सुरूवात केली आहे. यामध्ये हेरगिरी संदर्भात ज्योतीच्या संपर्कात असलेल्या आणखी व्यक्तीची नावे पुढे येण्याची शक्यता आहे. दरम्यान, युट्यूबर ज्योती मल्होत्राच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर बंदी घालण्यात आली आहे. (Jyoti Malhotra)
(हेही वाचा – अमित ठाकरेंनी पंतप्रधान मोदींना लिहीलेल्या पत्रावर Ashish Shelar म्हणाले …)
हरियणामधील हिस्सार पोलिसांनी १८ मे ला रात्री ज्योतीच्या घरी जाऊन चौकशी केली होती. तिथून काही कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत. राष्ट्रीय तपास संस्था (NIA) देखील ज्योतीच्या दहशतवादी संबंधांबद्दल चौकशी करण्यासाठी हिस्सारला पोहोचले आहे. तसेच ज्योती प्रसिद्धीच्या झोतात आल्यानंतर, बरेच लोक तिचे यूट्यूब अकाउंट ब्राउझ करत आहेत. त्यामुळे तीचे सबस्क्रायबर्सच्या संख्येत वाढ झाली आहे.
ज्योती मल्होत्राचे इंस्टाग्राम अकाउंट बंद
ज्योती मल्होत्राचा इंन्स्टाग्राम आयडी travelwithjo1 या नावाने आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, तीचे इंस्टाग्रामवर १.३३ लाख फॉलोअर्स होते. अनेक माध्यम वाहिन्यांनी त्यांच्या अहवालांमध्ये ज्योतीच्या इन्स्टाग्राम अकाउंटचा उल्लेख केला आहे. रविवारपर्यंत हे खाते सक्रिय होते असे सांगण्यात येते. मात्र सोमवारी ज्योतीचे इन्स्टाग्राम खाते चालू नसल्याचे दिसून येते. हे खाते कोणी बंद केले हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
(हेही वाचा – Fire : विधानभवनाच्या दारात अचानक आग; स्कॅनिंग मशिनमध्ये शॉर्ट सर्किट, विधिमंडळात खळबळ)
इंस्टाग्राम आयडी न दिसण्याची कारणे कोणती?
-
वापरकर्त्याचे इंस्टाग्राम दिसत नाही याची अनेक कारणे आहेत.
-
जर एखाद्या वापरकर्त्याने त्याचे खाते कायमचे किंवा तात्पुरते हटवले तर ते उपलब्ध होत नाही.
-
अनेक वेळा वापरकर्ता नाव बदलल्यामुळे जुने खाते दिसत नाही.
-
जर एखाद्या वापरकर्त्याने अटी आणि शर्तींचे उल्लंघन केले तर त्याचे/तिचे खाते तात्पुरते किंवा कायमचे बंद केले जाऊ शकते.
-
कधीकधी तांत्रिक कारणांमुळे इंस्टाग्राम अकाउंट दिसत नाही.
(हेही वाचा – 11th Admission 2025: अकरावीसाठी प्रवेशाची लगबग; सोमवारपासून ऑनलाइन प्रक्रिया सुरू)
यूट्यूब कारवाईच्या प्रतीक्षेत ?
ज्योती मल्होत्राच्या यूट्यूब सबस्क्राइबर्सची संख्या ३ लाख ७७ हजार होती, जी सोमवारी वाढून ३ लाख ८५ हजार झाली. ज्योतीचे ‘ट्रॅव्हल विथ जो’ (Travel with Jo) हे यूट्यूब चॅनल मोठ्या संख्येने लोक पाहतात. आतापर्यंत फक्त त्याचे इस्टाग्राम अकाउंट बंद करण्यात आले आहे. यूट्यूब आणि फेसबुक अकाउंट चालू आहेत. त्यामुळे ज्योतीने तिच्या यूट्यूब चॅनेलवर ४८७ व्हिडिओ अपलोड केले आहेत. ज्योतीने शेवटचा व्हिडिओ ७ दिवसांपूर्वी अपलोड केला होता जो इंडोनेशियाची राजधानी जकार्ताहून दिल्लीला परततानाचा आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community