-
प्रतिनिधी
परदेशातून मुंबईत ड्रग्ज (Drugs) तस्करीसाठी भारतीय महिलांचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात येत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. सीमाशुल्क विभागाने मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर नुकत्याच केलेल्या विविध कारवाईत ३० कोटींचा हायड्रोपोनिक गांजा या अमली पदार्थासह तीन महिलांसह पाच जणांना अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या महिला मुंबईतील विविध ठिकाणी राहणाऱ्या असून कुटुंब चालविण्यासाठी त्यांना या तस्करीच्या बेकायदेशीर व्यवसायात यावे लागल्याची कबुली महिलांनी दिली आहे.
(हेही वाचा – Pahalgam Terror Attack : काश्मीरला फिरायला जाऊ नका; सामाजिक माध्यमांवर का केले जात आहे आवाहन ?)
बँकॉक येथून मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी सातरस्ता जेकब सर्कल येथे राहणाऱ्या लक्ष्मण महाडिक (५९) आणि नालासोपारा येथे राहणारी हर्षा छेडा (४७) या दोन प्रवाशांना संशयावरून ताब्यात घेण्यात आले होते. दरम्यान दुसऱ्या एका प्रकरणात, सीमाशुल्क अधिकाऱ्यांनी नूर मोहम्मद बिलाखिया (४०) आणि आफरीन बिलाखिया (३६) या दोघींना ताब्यात घेतले, दोघेही भायखळ्याचे रहिवासी, बुधवारी बँकॉकहून मुंबईतील सीएसएमआय विमानतळावर पोहोचल्यानंतर काही प्रतिबंधित वस्तू घेऊन जात असल्याच्या माहितीच्या आधारे त्यांना ताब्यात घेत त्यांच्या ट्रॉली बॅगमधून ११.८० कोटी रुपये किमतीचे एकूण ११.८ किलो हायड्रोपोनिक वीड (गांजा) हा अमली पदार्थ (Drugs) मिळून आला.
(हेही वाचा – Pahalgam Terror Attack : अतिरेकी हल्ल्यामुळे विमान कंपन्यांनी कॅन्सलेशन-रिशेड्यूलिंग शुल्क केले माफ)
तिसऱ्या प्रकरणात कस्टम अधिकाऱ्यांनी बुधवारी ३४ वर्षीय ट्रॉम्बे रहिवासी मोहम्मद शफीक शेख याला बँकॉकहून ५.९० कोटी रुपयांच्या हायड्रोपोनिक तणाची तस्करी केल्याच्या आरोपाखाली अटक केली. तपासात असे दिसून आले आहे की, आरोपींना माहिती होती की हायड्रोपोनिक वीड (गांजा) आणि इतर बेकायदेशीर ड्रग्जची (Drugs) भारतात तस्करी केल्यास भारतातील कायद्यानुसार कठोर शिक्षा होते. तथापि, त्यांनी सांगितले की त्यांना भारतात या अवैध पदार्थाची तस्करी करण्याच्या बदल्यात मोठ्या प्रमाणात सहज पैसे मिळत होते. आतापर्यंत केलेल्या प्राथमिक तपासात आणि आरोपींनी दिलेल्या जबाबात हायड्रोपोनिक वीडच्या तस्करीच्या गुन्ह्यात या व्यक्तींचा सहभाग असल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणातील तपास अगदी प्राथमिक टप्प्यात आहे आणि ड्रग्ज कार्टेलमधील मुख्य आरोपीची ओळख पटविण्यासाठी अटक आरोपिकडे कसून चौकशी सुरू असल्याची माहिती सीमाशुल्क विभागाने दिली आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community