भारतीय विद्यार्थीनीचा अमेरिकेत Hit and Run अपघातात मृत्यू ! स्वप्नपूर्ती होण्याआधीच …

भारतीय विद्यार्थीनीचा अमेरिकेत Hit and Run अपघातात मृत्यू ! स्वप्नपूर्ती होण्याआधीच ...

138
भारतीय विद्यार्थीनीचा अमेरिकेत Hit and Run अपघातात मृत्यू ! स्वप्नपूर्ती होण्याआधीच ...
भारतीय विद्यार्थीनीचा अमेरिकेत Hit and Run अपघातात मृत्यू ! स्वप्नपूर्ती होण्याआधीच ...

एका 23 वर्षीय भारतीय तरूणीचा टेक्सासमध्ये रस्ते अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला आहे. अमेरिकेत पदव्यूत्तर पदवीचे शिक्षण घेणाऱ्या या तरूणीचा हिट अँड रन (Hit and Run) अपघातात मृत्यू झाला आहे. ती मुळची आंध्र प्रदेशच्या गुंटूर येथील रहिवासी आहे. मे महिन्यात तिचे पदव्युत्तर पदवीचे शिक्षण पूर्ण होणार होते. परंतु त्याआधीच तिच्यावर काळाने घाला घातला. (Hit and Run)

हेही वाचा-Uddhav Thackeray : वक्फ बोर्डाच्या विधेयकास विरोध का केला ? उद्धव ठाकरे म्हणाले …

पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, दीप्तीचा मृत्यू टेक्सासच्या डेंटनमध्ये झालेल्या अपघतात झाला. आंध्र प्रदेशातील गुंटूर जिल्ह्यातील रहिवासी असलेली 24 वर्षीय विद्यार्थी 12 एप्रिल रोजी कॅरिल अल लागो ड्राइव्हच्या 2300 ब्लॉकजवळ मैत्रिणीसोबत घरी जात होती. तेवढ्यात एका वेगवान वाहनाने त्यांना धडक दिली आणि तेथून वाहनचालक पळून गेला. (Hit and Run)

हेही वाचा- Memory of the World Register : श्रीमद् भगवद्गीता, भरत मुनींच्या नाट्यशास्त्राचा गौरव ! युनेस्कोने घेतली दखल

या अपघातात दीप्तीच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. तिच्यावर उपचार सुरू असताना 15 एप्रिल रोजी तिचा मृत्यू झाला. तर तिच्या मैत्रिणीवर उपचार सुरू असून शस्त्रक्रिया करण्यात आली आहे, असे कळते आणि तिची प्रकृती स्थिर असल्याचं कुटुंबीयांनी पीटीआयला सांगितले. (Hit and Run)

हेही वाचा- Delhi Building Collapse : दिल्लीत वादळामुळे 4 मजली इमारत कोसळली ; 4 जणांचा मृत्यू , ढिगाऱ्याखाली अनेक जण अडकले

पीटीआयच्या वृत्तानुसार, कुटुंब आता तिचे पार्थिव भारतात येण्याची वाट पाहत आहेत. सोमवारी पार्थिव हैदराबाद येथे येण्याची शक्यता आहे. अमेरिकेतील तेलुगू संघटना आवश्यक औपचारिकता आणि व्यवस्थांचे समन्वय साधण्यास मदत करत आहेत. नरसारावपेट अभियांत्रिकी महाविद्यालयातून बीटेक पदवीधर असेलल्या दीप्तीचे स्वप्न अधुरेच राहिले. (Hit and Run)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.