India-Pakistan War : पंजाबमध्ये 2 पाकिस्तानी गुप्तहेरांना अटक ! वायू सेनेची संवेदनशील माहिती आणि फोटो सापडले …

India-Pakistan War : पंजाबमध्ये 2 पाकिस्तानी गुप्तहेरांना अटक ! वायू सेनेची संवेदनशील माहिती आणि फोटो सापडले ...

173
India-Pakistan War : पंजाबमध्ये 2 पाकिस्तानी गुप्तहेरांना अटक ! वायू सेनेची संवेदनशील माहिती आणि फोटो सापडले ...
India-Pakistan War : पंजाबमध्ये 2 पाकिस्तानी गुप्तहेरांना अटक ! वायू सेनेची संवेदनशील माहिती आणि फोटो सापडले ...

पंजाबच्या अमृतसर पोलिसांनी रविवारी दोन हेरांना अटक केली आहे. पोलिसांनी सांगितले की दोघेही परदेशात लष्करी छावण्या आणि हवाई दलाच्या तळांची माहिती आणि छायाचित्रे पाठवत होते. हे दोघेही पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयचे कार्यकर्ते आहेत. (India-Pakistan War)

हेही वाचा-India-Pakistan War : पाकमध्ये ‘डर का माहौल’ ! पीओकेमध्ये पाकिस्तानी सैन्याने बनवले बंकर, वॉर सायरन आणि लोकांना घरे खाली करण्याचे आदेश

पलाक शेर मसीह आणि सूरज मसीह असं अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. ही सर्व माहिती जेलमध्ये बंद गँगस्टर हरप्रीत सिंग उर्फ पिट्टूच्या हॅप्पी नेटवर्कच्या माध्यमातून ISI पाठवली जात होती. पंजाब पोलिसांनुसार, अटकेतील आरोपींचं गुप्तहेर नेटवर्क असू शकते, जे सोशल मीडियावर बनावट कागदपत्राच्या आधारे सैन्य ठिकाणांवर पोहचून तिथली गोपनीय माहिती गोळा करत होते. या प्रकरणी Official Secrets Act अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. (India-Pakistan War)

हेही वाचा- India-Pakistan War : पाकिस्तानी राजदूताची भारतावर अणुहल्ल्याची धमकी ; पाकच्या पोकळ धमक्या सुरूच …

या दोन आरोपींनी पाकिस्तानला काय काय माहिती दिली, त्यामागे त्यांचा हेतू काय होता या सर्व प्रकाराची चौकशी पोलीस करत आहेत. त्याशिवाय या गुप्तहेरांचे नेटवर्क शोधण्याचं काम पोलीस करत आहे. पलक शेर मसीह आणि सूरज मसीह यांच्याकडे अमृतसर येथील वायू सेनेच्या ठिकाणांची संवेदनशील माहिती आणि फोटो मिळाले आहेत. प्राथमिक तपासात या दोघांचा संबंध पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणा ISI शी असल्याचं उघड झाले आहे. (India-Pakistan War)

हेही वाचा- India VS Pakistan War : राजस्थानमधून घुसखोरी करणारा पाकिस्तानी रेंजर BSF च्या ताब्यात !

पोलीस महासंचालक गौरव यादव यांनी या दोघांच्या अटकेची बातमी पोस्ट केली आहे. पंजाब पोलिस देशाच्या सुरक्षेशी तडजोड करणाऱ्याला कुठल्याही किंमतीत सोडणार नाही असं त्यांनी म्हटलं आहे. ही निर्णायक कारवाई असून येणाऱ्या काळात आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता आहे. (India-Pakistan War)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.