IL&FS : तब्बल १९ बँकांची फसवणूक केल्याप्रकरणी आयएलएफएसची सीबीआयकडून चौकशी

यातील आरोपी हे व्हाईट कॉलर गुन्हेगार असून त्यांना कायद्याची चांगली माहिती आहे. कायद्याच्या कचाट्यातूव स्वतःला कसे वाचवायचे हे देखील माहित आहे.

118
IL&FS : तब्बल १९ बँकांची फसवणूक केल्याप्रकरणी आयएलएफएसची सीबीआयकडून चौकशी

मिळालेल्या माहितीनुसार, आयएल अँड एफएस (IL&FS) या कंपनीने देशातील प्रमुख १९ बँकांची फसवणूक केली आहे. यादरम्यान त्यांनी तब्बल ६,५२४ कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी सीबीआयने एकूण सहा जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या १९ बँकांमध्ये पंजाब नॅशनल बँक, कॅनरा बँक, बँक ऑफ इंडिया, स्टेट बँक ऑफ इंडिया, येस बँक आणि अन्य बँकांचा समावेश आहे.

(हेही वाचा – Forced conversion : “मला जबरदस्तीने धर्मांतरही करायला लावलं, आणि…”; हिंदू असल्याचं भासवत मुस्लिम तरुणाने केले हिंदू मुलीवर अत्याचार)

देशातील वाहतुकीच्या पायाभूत सुविधांच्या निर्मितीत कार्यरत असलेल्या या कंपनीने (IL&FS) या १९ बँकांकडून हे कर्ज घेतले होते. मात्र, कालांतराने कंपनीमध्ये आर्थिक अनियमितता आली. या पार्श्वभूमीवर २०१८ मध्ये एनसीएलटी कंपनीमध्ये नवे संचालक मंडळ स्थापन झाले. त्यानंतर कंपनीच्या पूर्व संचालकांनी केलेला हा आर्थिक घोटाळा समोर आला. याप्रकरणी सध्या सीबीआयकडून पुढील तपास सुरु आहे.

हेही पहा – 

त्यांना कायद्याची चांगली माहिती आहे

कॅनरा बँकेने सीबीआयला केलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, (IL&FS) द्वारे ६,५२४ कोटी रुपयांहून अधिक रुपयांचा घोटाळ केला आहे. यातील आरोपी हे व्हाईट कॉलर गुन्हेगार असून त्यांना कायद्याची चांगली माहिती आहे. कायद्याच्या कचाट्यातूव स्वतःला कसे वाचवायचे हे देखील माहित आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.