पुण्यात ‘Hit And Run’ ! भरधाव मर्सिडीज कारने दुचाकीस्वाराला उडवलं ; एकाचा मृत्यू , दोन जखमी

पुण्यात ‘Hit And Run’ ! भरधाव मर्सिडीज कारने दुचाकीस्वाराला उडवलं ; एकाचा मृत्यू , दोन जखमी

86
पुण्यात ‘Hit And Run’ ! भरधाव मर्सिडीज कारने दुचाकीस्वाराला उडवलं ; एकाचा मृत्यू , दोन जखमी
पुण्यात ‘Hit And Run’ ! भरधाव मर्सिडीज कारने दुचाकीस्वाराला उडवलं ; एकाचा मृत्यू , दोन जखमी

पुण्यात पुन्हा एकदा हिट अँड रनची (Hit And Run) घटना समोर आली आहे. शहरातील नवले ब्रिज जवळ ही घटना घडली आहे. पुण्यातील नवले ब्रीजवर वारंवार अपघाताच्या घटना समोर येतात, अशातच नवले ब्रिजवर मर्सिडीज कारने दुचाकीस्वराला उडवलं. या घटनेने पुणे शहरात मोठी खळबळ उडाली आहे. (Hit And Run)

हेही वाचा-IRCTC च्या नियमात बदल ! आता वेटिंग तिकिट असलेल्यांना स्लीपर आणि एसी कोचमध्ये नो एन्ट्री

नवले ब्रिज जवळ एका भरधाव मर्सिडीज कारने दुचाकीस्वाराला उडवल्याची माहिती आहे. या घटनेत दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला आहे. कुणाल हुशार (रा. चिंचवड) असं मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. अपघातात एकाचा मृत्यू तर दोन जण गंभीर जखमी आहेत. दोन कारचालकांना पुणे पोलिसांनी अटक केली आहे. आरोपींविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Hit And Run)

हेही वाचा-Weather Update : उत्तरेकडील राज्यांना अवकाळीचा फटका ! वादळामुळे १० जणांचा मृत्यू

पुण्यातील सिंहगड रोड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आज पहाटे चार वाजता अपघाताची घटना घडली आहे. आरोपी मद्यधुंद अवस्थेत कार चालवत असल्याचा स्थानिकांचा दावा आहे. (Hit And Run)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.