Dawood Ibrahim : हसीनाच्या मुलाने सांगितली दाऊद आणि त्याच्या भावांची पिलावळ

4382
  • संतोष वाघ

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमची (Dawood Ibrahim) मयत बहीण हसीना पारकर उर्फ आपा चा मुलगा अलिशाह याने दाऊद मामुच्या दुसऱ्या लग्नाची पोलखोल करून दाऊदच्या संपूर्ण वंशावळीचा उलगडा राष्ट्रीय तपास संस्थे( एनआयए) कडे केला.

दाऊदने पहिली पत्नी मैजाबीन ही हयात असतानाही तिला तलाक (घटस्फोट) न देता पाकिस्तानातील पठाणच्या मुलीसोबत दुसरा निकाह (विवाह) केल्याचा दावा अलिशाहने एनआयएला दिलेल्या माहितीत केला आहे. एनआयएने टेरर फंडिंग प्रकरणात दाखल केलेल्या आरोपपत्रात, म्हटले आहे की अलिशाह पारकरने दाऊदच्या कौटुंबिक वंशावळीची तपशीलवार माहिती दिली आहे.  ज्यात त्याने दावा केला आहे की, दाऊदने स्वतःला पाकिस्तानच्या कराचीमध्ये दुसऱ्या ठिकाणी हलवले आहे.

दाऊदसह त्याच्या ९ जणांच्या भाऊ-बहिणींचे कुटुंब  

अलिशाह पारकरच्या वक्तव्यानुसार दाऊदला चार भाऊ (स्वतःसह ५) आणि चार बहिणी आहेत. “दाऊद इब्राहिमने  (Dawood Ibrahim) पुनर्विवाह केला आहे. त्याची दुसरी पत्नी पाकिस्तानी पठाण आहे, असे अलिशाहने एनआयएला तपासा दरम्यान सांगितले. अलिशाह इब्राहिम पारकरच्या म्हणण्यानुसार, दाऊद इब्राहिम लोकांना सांगत होता की, त्याने आपली पहिली पत्नी मैजाबीन हिला घटस्फोट देऊन दुसरे लग्न केले आहे, परंतु हे खोटे आहे. याशिवाय दाऊद इब्राहिमचा पत्ताही बदलला आहे. आता तो कराचीतील अब्दुल्ला गाझी बाबा दर्ग्याच्या मागे असलेल्या रहीम फकीर जवळील संरक्षण क्षेत्रात राहतो.

(हेही वाचा Dawood Ibrahim : दाऊदचा बालेकिल्ला डोंगरातील पाकमोडिया स्ट्रीट वर ‘सन्नाटा’)

दाऊदच्या पहिल्या पत्नीला ४ मुले 

अलिशाह पारकरच्या निवेदनात पुढे म्हटले आहे की, काही महिन्यांपूर्वी तो दाऊद इब्राहिमची पत्नी मैजाबीन हिला जुलै २०२२ मध्ये दुबईत भेटला होता. सध्या दाऊद इब्राहिम कासकर, हाजी अनीस उर्फ अनीस इब्राहिम शेख आणि मुमताज रहीम फकी हे त्यांच्या कुटुंबीयांसह अब्दुल्ला गाझी बाबा दर्ग्याच्या मागे डिफेन्स कॉलनी, पाकिस्तान, कराची येथे राहतात. अलिशाह पारकरच्या म्हणण्यानुसार दाऊद इब्राहिम (Dawood Ibrahim)  कोणाशीही संपर्क ठेवत नाही. एनआयएला दिलेल्या निवेदनानुसार दाऊद इब्राहिम कासकरच्या पत्नीचे नाव मैजाबीन असून तिला तीन मुली आहेत. एकीचे नाव मारुख (जावेद मियांदादचा मुलगा जुनैदशी विवाहित), दुसरीचे नाव मेहरीन, तर तिसरीचे नाव माझिया (अविवाहित) आणि मुलाचे नाव मोहिन नवाज आहे. दाऊद इब्राहिमची दुसरी पत्नी पाकिस्तानी पठाण आहे. दाऊद इब्राहिम हा पहिल्या पत्नीला घटस्फोट दिल्याचे दाखवत असला तरी ते साफ चुकीचे आहे. त्याने पहिल्या पत्नीला घटस्फोट दिलेलाच नसून ती सोबतच राहते असे अलिशाह याने निवेदनात म्हटले आहे.

भाऊ साबीर इब्राहिमला दोन मुले 

अलिशहा पारकरने दाऊदच्या भावांचीही सविस्तर माहिती निवेदनात दिली आहे, साबीर इब्राहिम कासकरचा १९८३-८४ मध्ये मुंबईतील टोळीयुद्धात मृत्यू झाला होता. त्याच्या पत्नीचे नाव शेनाज आहे, त्याला शिराज नावाचा मुलगा आणि शाहझिया नावाची मुलगी आहे. शिराजचा २०२० मध्ये पाकिस्तानमध्ये कोविड-१९ मुळे मृत्यू झाला. शाहझिया तिचा पती मोज्जम खानसोबत मुंबईतील आग्रीपाडा येथे राहते. मोज्जम खान हा इस्टेट एजंट आहे. नूरा इब्राहिम कासकरचा सात-आठ वर्षांपूर्वी पाकिस्तानात मृत्यू झाला होता. त्यांच्या पहिल्या पत्नीचे नाव शफिका होते, ती देखील मरण पावली. पाकिस्तानात राहणाऱ्या रेश्मासोबत त्याने दुसरे लग्न केले होते. त्याला शफिकापासून एक मुलगी असून तिचे नाव साबा आहे.

(हेही वाचा Dawood Ibrahim : दाऊदच्या वृत्ताने गुन्हेगारी विश्वात खळबळ, दाऊदचे मुंबईतील नातलग मात्र चिडीचूप)

भाऊ इक्बाल कासकरला पाच मुले  

इक्बाल कासकर गेल्या पाच वर्षांपासून ठाणे कारागृहात आहे, इक्बाल कासकरच्या पत्नीचे नाव रिजवाना असून ती दुबईत राहते. दुबईत राहणारी मुलगी हफसा, स्पेनमध्ये राहणारी झारा, दुबईत आईसोबत राहते. इकबालचा एक मुलगा रिजवान मुंबईतील आर्थर रोड जेलमध्ये आणि दुसरा मुलगा अबान दुबईत आहे, इकबाल याला अशी पाच मुले आहेत.

भाऊ अनीस इब्राहिमला ५ मुले 

अलिशाहने पुढे म्हटले आहे की, अनीस इब्राहिमच्या पत्नीचे नाव तेहसीन आहे, तिला तीन मुलींसह पाच मुले आहेत, एकीचे नाव शमीम आहे (मुंबईतील शाहदाब खानशी विवाहित आणि दुबईमध्ये राहतो). दुसरी मुलगी यास्मिन (पाकिस्तानी असगरशी लग्न झालेली आणि कराचीमध्ये राहते) आणि तिसरी मुलगी आना (सालिकशी लग्न झालेली, जो पाकिस्तानी आहे आणि कराचीमध्ये राहतो) आणि इब्राहिम नावाचे दोन मुलगे (ज्याने पाकिस्तानी मुलगी कुर्तरुलेनशी लग्न केले आहे.) आणि दुसरा मुलगा मेहरान (जो लंडनमध्ये शिकत आहे आणि अविवाहित आहे). अनीसचे कुटुंब पाकिस्तानात राहते.

मुस्तकीन इब्राहिम कासकरला २ मुले 

“मुस्तकीन इब्राहिम कासकरच्या पत्नीचे नाव सीमा आहे. तिला दोन मुली आहेत. पहिल्या मुलीचे नाव सेहेर आहे (लखनऊमध्ये खालिदशी लग्न केले होते) आणि ती लखनऊमध्ये राहते. दुसरी मुलगी, अम्मिना ( लंडनमधून एलएलबी, एलएलएम केली आहे.), ती सध्या दुबईमध्ये वकिली करत आहे. तिला ओवेस नावाचा एक (त्याचे लग्न गुड्डू पठाणच्या मुलीशी झाले आहे) आणि दुसरा हमजा (शिकत आहे) दुबईत राहतो, अशी दोन मुले आहेत, असे निवेदनात म्हटले आहे.

हुमायून इब्राहिमला दोन मुली 

अलिशाहने सांगितले की, हुमायून इब्राहिम कासकरचा चार ते पाच वर्षांपूर्वी मृत्यू झाला होता. त्यांच्या पत्नीचे नाव शाहीन आहे, त्यांना दोन मुली आहेत, त्यांची नावे मारिया आणि सामिया आहेत. दोघांचे लग्न झालेले नाही. ते दोघेही कराचीत राहतात, असे त्यांनी सांगितले.

(हेही वाचा Javed Miandad पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू जावेद मियांदाद नजरकैदेत; काय आहेत Dawood Ibrahim शी संबंध)

दाऊदची बहीण सईदा वाघले हिला दोन मुली 

दाऊदच्या  (Dawood Ibrahim)  बहिणींबद्दल माहिती देताना अलिशाहने सांगितले की, पहिली बहिण सईदा हसन मिया वाघले हिने हसन मियाशी लग्न केले जे दोघेही मृत झाले आहेत. त्या दोघांना दोन मुली आहेत. नजमा आणि पिंकी अशी त्यांची नावे असून त्यांना साजिद आणि समीर उर्फ लाला अशी दोन मुले आहेत, असे त्यांनी सांगितले.

बहीण हसिना इब्राहिम पारकरला तीन मुले    

हसिना इब्राहिम पारकरने इब्राहिम पारकरशी लग्न केले. दोघांचा मृत्यू झाला आहे. त्याला दानिश (कार अपघातात मरण पावलेले), अलिशाह आणि दोन मुली कौशिया आणि उमरा नावाचे दोन मुलगे आहेत. “जैतुन हमीद अंतुले यांनी हमीद अंतुले यांच्याशी लग्न केले. हमीद अंतुले यांना सीबीआयने एका प्रकरणात आरोपी केले होते आणि त्यांची दुबईत माणिकचंद एजन्सी आहे. तिला दोन मुले आहेत ज्यांची नावे साबीर आणि हुसैन आणि मुलगी सईदा आहेत. ते सर्व दुबईत राहतात,” तो म्हणाला. फरजाना सौद तुंगेकरने सौद तुंगेकरसोबत लग्न केले. त्यांना जुनैद आणि मोहम्मद अली नावाचे दोन मुलगे आणि दोन मुली, एकाचे नाव साहिला आणि दुसरी मुलगी एरम आहे. मुमताज रहीम फकीचा विवाह रहीम फकीशी झाला आहे. रहीम फकी हा जेजे गोळीबार प्रकरणात हवा आहे. तिला दोन मुले अनिक आणि सामी आणि एक मुलगी झैनब आहे.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.