Hafiz Saeed चे दहशतवादी नेटवर्क अजूनही भारताविरुद्ध सक्रिय ; एनआयएची न्यायालयात माहिती

Hafiz Saeed चे दहशतवादी नेटवर्क अजूनही भारताविरुद्ध सक्रिय ; एनआयएची न्यायालयात माहिती

111
Hafiz Saeed चे दहशतवादी नेटवर्क अजूनही भारताविरुद्ध सक्रिय ; एनआयएची न्यायालयात माहिती
Hafiz Saeed चे दहशतवादी नेटवर्क अजूनही भारताविरुद्ध सक्रिय ; एनआयएची न्यायालयात माहिती

राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) विशेष न्यायालयाला माहिती दिली आहे की २६/११ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यातील हाफिज मोहम्मद सईद (Hafiz Saeed) हा अजूनही आरोपी आहे आणि त्याच्याशी संलग्न दहशतवादी संघटनेने भारताविरुद्ध कारवाया सुरू ठेवल्या आहेत. तहव्वुर राणाच्या रिमांडची मागणी करताना एनआयएने हे विधान केले. (Hafiz Saeed)

हेही वाचा-Amit Shah : “हे नरेंद्र मोदींचं सरकार, दहशतवाद्यांना वेचून…” ; अमित शाहांचा पाकड्यांना इशारा

तहव्वुर राणा याच्या कोठडीची मागणी करताना एनआयएने म्हटले आहे की, तहव्वुर राणा लष्कर-ए-तोयबा आणि त्याचा प्रमुख हाफिज सईद (Hafiz Saeed) यांच्या भारताविरोधात चालू असलेल्या आणि भविष्यातील दहशतवादी कटांवर प्रकाश टाकू शकतो. पीटीआय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एनआयएने म्हटले आहे की, “हाफिज सईद हा या प्रकरणातील आरोपी आहे आणि त्याची दहशतवादी संघटना लष्कर-ए-तैयबा अजूनही भारतात दहशतवादी हल्ल्यांमध्ये सहभागी आहे. लष्कर-ए-तैयबाच्या कार्यवाहीची माहिती उघड करण्यासाठी राणाची आणखी काही काळ कोठडी आवश्यक आहे.” (Hafiz Saeed)

हेही वाचा- आधुनिक शेतीसाठी नवकल्पनांना प्राधान्य द्या; मंत्री Manikrao Kokate यांचे प्रतिपादन

हाफिज सईद (Hafiz Saeed) पाकिस्तानच्या कथित कोठडीत आहे, तो अनेक दहशतवादी संघटनांना पैसे पुरवण्याच्या प्रकरणांमध्ये ४६ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा भोगत आहे. सात दहशतवादी घटनांमध्ये पैसे पुरवल्या प्रकरणी दोषी आढळल्यामुळे, सईद १२ फेब्रुवारी २०२० पासून शिक्षा भोगत आहे. पाकिस्तान सईद शिक्षा भोगत असल्याचा दावा करत असताना, अनेक अहवाल असे सूचित करतात की लष्कर-ए-तोयबाच्या संस्थापकाला क्वचितच पारंपारिक तुरुंगात ठेवण्यात आले आहे. यामुळे त्याला पाकिस्तानमध्ये उघडपणे फिरणे शक्य आहे. (Hafiz Saeed)

हेही वाचा- BMC : मुंबईत आता दुसऱ्या सत्रातील साफसफाई जोरात; तीन वॉर्ड वगळता आता कचरा वाहून नेण्याच्या कामाचे खासगीकरण

तहव्वुर राणा यांच्याबाबत, एनआयएने म्हटले आहे की, ते राणाच्या आरोग्याचा विचार करून मर्यादीत चौकशीच करत आहेत, परंतु दिवसातून २० तास चौकशी केली जात असल्याचा त्याचा दावा आहे. दरम्यान, २८ एप्रिल रोजी न्यायालयाने २६/११ मुंबई हल्ल्यातील आरोपी तहव्वुर राणाच्या एनआयए कोठडीत आणखी १२ दिवसांची वाढ केली आहे. (Hafiz Saeed)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.