Gutkha Seized: गुटखा वाहतूक करणाऱ्यांचे धाबे दणाणले; कर्नाटकात २.६० कोटींच्या मुद्देमालसह ११ ट्रक जप्त 

178
Gutkha Seized : गुटखा वाहतूक करणाऱ्यांचे धाबे दणाणले; कर्नाटकात २.६० कोटींच्या मुद्देमालसह ११ ट्रक जप्त 
Gutkha Seized : गुटखा वाहतूक करणाऱ्यांचे धाबे दणाणले; कर्नाटकात २.६० कोटींच्या मुद्देमालसह ११ ट्रक जप्त 
Gutkha Seized: गुटखा उत्पादन तथा विक्रीला राज्यासह देशभरात बंदी आहे. तरी देखिल छुप्या पद्धतीने गुटखा विक्रीची तस्करी चालूच आहे. अशीच एक घटना कर्नाटक राज्यात घडली आहे. यामध्ये कर्नाटकातून दिल्लीकडे सुपारी वाहून नेणाऱ्या ११ ट्रकची अन्न व औषध प्रशासनाच्या (FDA) पथकाने रविवारी २० एप्रिलला नळदुर्ग (Naldurg Gutkha Seized) परिसरातील फुलवाडी टोलनाका येथे तपासणी केली. यामध्ये दोन कोटी ५९ लाख रुपयांची खराब चिकनी सुपारी जप्त केली आहे. खराब सुपारीचे नमुने सोमवारी प्रयोगशाळेत तपासणीकरिता पाठविण्यात आले आहेत. (Gutkha Seized)

(हेही वाचा – Fraud : बनावट टूर ऑपरेटरकडून ७२ डॉक्टरांची २ कोटी रुपयांची फसवणूक; गुन्हा दाखल)

अहवाल आल्यानंतर गुन्ह्याची प्रक्रिया राबविली जाणार आहे. सुपारीबाबत प्रथमच मोठी कारवाई केल्याने गुटखा वाहतूक करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. लाल सुपारी पूजेसाठीही वापरली जाते. लाल चिकन्या सुपारीचा पानमसाला व गुटख्यातही वापर केला जातो. अशा सुपारीने भरलेले ११ ट्रक रविवारी सकाळी एकामागून-एक सोलापूर मार्गे दिल्लीकडे निघाले होते. एफडीएच्या अधिकाऱ्यांना फुलवाडी टोलनाका परिसरात ट्रकची झडती घेतली. यावेळी ट्रकमधील सुपारी खराब असल्याचे आढळले. रविवारी रात्री उशिरापर्यंत एफडीएचे पथक पकडलेल्या ट्रकमधील सुपारी जप्त करण्यात व्यस्त पकडलेल्या प्रत्येक ट्रकमध्ये २५ टन सुपारी आढळून आली. अन्नसुरक्षा अधिकाऱ्यांच्या पथकास कारवाईदरम्यान स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाचे सुद्धा त्यांना सहकार्य लाभले.
प्रयोगशाळेचा अहवला आल्यानंतर पुढील कारवाई 
अन्न प्रशासन विभागाच्या पथकास रविवारी तपासणी दरम्यान फुलवाडी टोलनाका येथे ११ ट्रक सुपारी घेऊन जाताना आढळले. लाल रंगाची सुपारी खराब असल्याचे आढळून आले आहे. सुपारीत केमिकलयुक्त रंग वापरला का, हे सुद्धा प्रयोगशाळेच्या अहवालातून स्पष्ट होणार आहे. त्यामुळे याप्रकरणी प्रयोगशाळेचा अहवला आल्यानंतर पुढील कारवाई केली जाणार आहे.
(हेही वाचा – Solapur जवळ चालत्या रेल्वेवर अज्ञाताने मारला दगड; चिमुकलीचा दुर्दैवी अंत)
दरम्यान, प्रदीप कुटे, सहाय्यक आयुक्त, अन्न प्रशासन पदार्थांमध्ये भेसळ होऊ नये, एक्सपायरी डेट संपलेले पदार्थ नागरिकांच्या माथी कंपन्यांनी मारु नयेत, यासाठी अन्न प्रशासन खाद्यपदार्थांवर देखरेख ठेवते. सातत्याने उत्पादक कंपन्यांची तपासणी करणे, गुटखा विक्रीस प्रतिबंध घालणे आदी कारवाया एफडीए करते. मात्र, वर्षभरापासून धाराशिव (Dharashiva) जिल्ह्यातील तीनही अन्नसुरक्षा अधिकाऱ्यांची पदे रिक्त असल्याने भेसळ करणाऱ्यांचे फावत आहे. एफडीएने ११ ट्रक पकडून खराब सुपारी जप्त केली. तसेच बाजारभावानुसार याची किंमत दोन कोटी ५९ लाख ५३ हजार २०० रुपये असल्याचे समजते. या जप्त केलेल्या सुपारीचे नमुने सोमवारी प्रयोगशाळेत पाठविले जाणार आहेत.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.