Gujrat ATS : सीमा सुरक्षा दल(बीएसएफ) आणि भारतीय नौदलाची संवेदनशील माहिती पाकिस्तानला पाठविणाऱ्या सहदेव सिंग गोहिलला गुजरात दहशतवादविरोधी पथक(Gujrat ATS)ने अटक केली आहे. गुजरातच्या कच्छ जिल्ह्यातील बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी असणाऱ्या गोहिलला गोपनीय माहिती पाकिस्तानी एजंटसोबत शेअर केल्याच्या आरोपाखाली अटक केली आहे. मागील काही दिवसांपासून ऑपरेशन सिंदूरची संवेदनशील माहिती पाकिस्तानला देणाऱ्या हेरांना भारतीय तपास यंत्रणांकडून अटक करण्यात आली आहे.(Gujrat ATS)
(हेही वाचा हिंदूंनी भारताला हिंदु राष्ट्र करण्यासाठी आवश्यक पाऊले उचला; MLA T Raja Singh यांची मागणी )
दरम्यान, सहदेव सिंग गोहिलचा पाकिस्तानी एजंट म्हणून कार्यरत असणाऱ्या अदिती भारद्वाज नावाच्या महिलेशी व्हॉट्सअपद्वारे संवाद झाल्याचे तपासात उघडकीस आले आहे. गुजरात एटीएसचे एसपी के सिध्दार्थ यांनी सांगितले की, गोहिलने बीएसएफ आणि भारतीय नौदलाच्या साईट्सचे संवेदनशील फोटो आणि व्हिडीओ शेअर केले होते. त्यानंतर आरोपीला दि. १ मे रोजी प्राथमिक चौकशीसाठी बोलाविण्यात आले होते, असेही ते म्हणाले.
ते पुढे म्हणाले, जून-जुलै २०२३ दरम्यान सहदेव सिंग गोहिल व्हॉट्सअॅपद्वारे अदिती भारद्वाज नावाच्या महिलेच्या संपर्कात आल्याचे उघड झाले. तिच्याशी बोलताना त्याला कळले की ती पाकिस्तानी एजंट आहे. तिने बांधकामाधीन किंवा नव्याने बांधण्यात आलेल्या बीएसएफ आणि भारतीय नौदलाच्या ठिकाणांचे फोटो आणि व्हिडिओ गोहिलकडे मागितले. त्याने व्हॉट्सअॅपद्वारे फोटो आणि व्हिडिओ शेअर करण्यास सुरुवात केली, अशी माहिती एसपी के सिद्धार्थ यांनी दिली.
(हेही वाचा Bangladeshi infiltrators : दिल्लीत मोठी कारवाई ! १२१ बांगलादेशी घुसखोरांची ओळख पटली आता परत पाठवणार )
२०२३ मध्ये भारद्वाजने सुरुवातीला संपर्क साधलेल्या गोहिलने २०२५ मध्ये महत्त्वाची माहिती शेअर करणे सुरू ठेवले आणि त्याच्या कृत्यांसाठी आर्थिक भरपाई मिळवली, असे एटीएसच्या तपासात आढळून आले आहे. फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीच्या विश्लेषणातून एजंट असलेल्या भारद्वाजचा व्हॉट्सअॅप नंबर पाकिस्तानमधून चालवले जात होते, हे उघड झाले. दरम्यान, गोहिल आणि भारद्वाज यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिताच्या कलम ६१ आणि १४८ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.(Gujrat ATS)
२०२५ सुरुवातीला गोहिलने स्वतःच्या आधार कार्डवर एक सिम कार्ड खरेदी केले. त्यानंतर ओटीपीच्या मदतीने आदिती भारद्वाजसाठी त्या नंबरवर व्हॉट्सअॅप सक्रिय केल्यानंतर नंबरवर बीएसएफ आणि भारतीय नौदलाशी संबंधित सर्व फोटो आणि व्हिडिओ शेअर केले गेले. त्याला दुसऱ्या एका व्यक्तीने ४०,००० रुपये रोख देखील दिले. त्याचा फोन एफएसएलला पाठविण्यात आला होता. आदिती भारद्वाजच्या नावाखाली असलेले व्हॉट्सअॅप नंबर पाकिस्तानमधून ऑपरेट केले जात होते,” असे गुजरात एटीएस एसपीने सांगितले.(Gujrat ATS)
Join Our WhatsApp Community