Gold Smuggling : एअर इंडियाच्या क्रू मेंबरला अटक; एक किलो सोन्यावर मिळत होते दोन लाख रुपये

77
Gold Smuggling : एअर इंडियाच्या क्रू मेंबरला अटक; एक किलो सोन्यावर मिळत होते दोन लाख रुपये
  • प्रतिनिधी 

अमेरिकेतून भारतात सोन्याची तस्करी (Gold Smuggling) करणाऱ्या एअर इंडियाच्या एका क्रू मेंबरला महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) अटक केली आहे. डीआरआयने या तस्करी रॅकेटचा मास्टरमाईंड असणाऱ्याला देखील अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या क्रू मेंबर कडून १.४१ कोटी रुपयांचे तस्करी केलेले सोने जप्त करण्यात आले आहे. गुप्त माहितीच्या आधारे कारवाई करताना, डीआरआय अधिकाऱ्यांनी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर कस्टम ग्रीन चॅनेल ओलांडल्या नंतर एक्झिट गेटजवळ न्यू यॉर्कहून एआय-११६ या फ्लाइटने आलेले ४२ वर्षीय क्रू मेंबर गिरीश पिंपळे यांना अडवण्यात आले. त्याच्या चौकशीत, डीआरआय अधिकाऱ्यांनी दोन कागदपत्रे जप्त केली ज्यावर सोने खरेदी बाबत हस्तलिखित आकडे आढळली. त्यामुळे डीआरआयला पिंपळे यांचा सोने तस्करी रॅकेटमध्ये सहभाग असल्याचा संशय आल्याने त्याची चौकशी करण्यात आली. (Gold Smuggling)

(हेही वाचा – Census 2027 : भारतातील पहिली डिजिटल जनगणना ! अ‍ॅपचा वापर, ३५ लाख जनगणना अधिकारी… वाचा सविस्तर माहिती एका क्लिकवर)

चौकशीदरम्यान त्यांनी तस्करीच्या (Gold Smuggling) कामात आपली भूमिका असल्याचे कबूल केले. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या आंतरराष्ट्रीय आगमन हॉलमधील बॅगेज सर्व्हिसेस एरियाजवळ ठेवलेल्या सोफ्याच्या बाजूला पिंपळे यांनी १३७३.२ ग्रॅम परदेशी मूळचे सोने (१.४१ कोटी रुपये किमतीचे) असलेली एक थैलीही दाखवली, जी नंतर जप्त करण्यात आली, असे सूत्रांनी सांगितले. पिंपळे यांच्या पुढील चौकशीत असे समोर आले की राकेश राठोड नावाच्या एका व्यक्तीला हे तस्करीचे सोने देण्यात येणार होते, राठोड हा तस्करी रॅकेट चालवणारा सूत्रधार आहे. त्यानंतर राठोडला अटक करण्यात आली. राठोड या मास्टरमाइंडने एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांना तस्करीच्या प्रत्येक १ किलो सोन्यावर २ लाख रुपये देण्याची ऑफर दिली होती. हे रॅकेट कसे चालवले जात होते हे स्पष्ट करताना, सूत्राने सांगितले की राठोड हा पिंपळेला अमेरिकेत सोने खरेदी करण्यास सांगायचा, रोखीने पैसे द्यायचे, ते भारतात तस्करी करायचे आणि त्याला द्यायचे, कारण त्यात मोठा नफा होतो. (Gold Smuggling)

(हेही वाचा – Israel Iran war : इराणने आता थेट अमेरिकन दूतावासावर डागली क्षेपणास्त्रे !)

क्रू मेंबर्सची चौकशी होत नसल्याने, त्याचा फायदा घेत राठोडने पिंपळेला तस्करीच्या कामासाठी घेण्याचा निर्णय घेतला. तपासात असे दिसून आले आहे की, राठोडने पिंपळेला तस्करीच्या (Gold Smuggling) प्रत्येक १ किलो सोन्यावर २ लाख रुपये देऊ केले होते. तो पिंपळेला सोने खरेदी करण्यासाठी काही हवाला मार्गांचा वापर करून अमेरिकेत रोख रकमेची व्यवस्थाही करत असे. अलिकडेच, राठोडने पिंपळेला तस्करीसाठी सोने खरेदी करण्यासाठी अमेरिकेत १,५०,००० अमेरिकन डॉलर्सची व्यवस्था केली, असे सूत्रांनी सांगितले. पुढील तपासात असे दिसून आले आहे की, राठोड आणि पिंपळे गेल्या वर्षभरापासून एकमेकांना ओळखत आहेत आणि त्याने यापूर्वी दोन वेळा पिंपळेने दोन वेळा सोन्याची तस्करी केली होती. राठोडचा गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे. २०२० मध्ये मुंबई कस्टम्सने त्याच्यावर सोन्याच्या तस्करीच्या प्रकरणात गुन्हा दाखल केला होता. डीआरआयचे अधिकारी या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत आणि रॅकेटमधील इतर सदस्यांची माहिती आणि सोने खरेदी करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या निधीचा स्रोत शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. दोन्ही आरोपींना सीमाशुल्क कायद्याच्या संबंधित कलमांखाली अटक करण्यात आली आहे. (Gold Smuggling)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.