Ghatkopar Rape Case: घाटकोपर मध्ये हिंदू तरुणीवर मुस्लिम तरुणाचा लैगिंक अत्याचार करून जीवे मारण्याची धमकी

79
Ghatkopar Rape Case: घाटकोपर मध्ये हिंदू तरुणीवर मुस्लिम तरुणाचा लैगिंक अत्याचार करून जीवे मारण्याची धमकी 
Ghatkopar Rape Case: घाटकोपर मध्ये हिंदू तरुणीवर मुस्लिम तरुणाचा लैगिंक अत्याचार करून जीवे मारण्याची धमकी 

इस्टाग्रामवर ओळख झालेल्या एका मुस्लिम तरुणाने २१ वर्षीय हिंदू तरुणीला मारहाण करून बळजबरीने तिच्यावर वारंवार लैगिंक अत्याचार केल्याची संतापजनक घटना घाटकोपर पश्चिम येथे उघडकीस आली आहे. या प्रकरणी घाटकोपर पोलिसांनी या तरुणाविरुद्ध लैगिंक अत्याचार,मारहाण करणे, जीवे मारण्याची धमकी देणे या प्रकरणी गुन्हा दाखल करून तरुणाला अटक करण्यात आले. (Ghatkopar Rape Case)

असाद शेख (Asad Sheikh) (२४) असे या आरोपी तरुणाचे नाव आहे, व्यवसायाने टेम्पो चालक असणारा असद हा सकिनाका परिसरात राहण्यास आहे. घाटकोपर पोलीस ठाण्याच्या (Ghatkopar police station) हद्दीत राहणारी २१ वर्षीय हिंदू तरुणीची इन्स्टाग्राम या सोशल मीडियावर असद सोबत ओळख झाली होती. ओळखीचे रूपांतर मैत्रीत झाले. असद आणि पीडित तरुणी एकमेकांच्या संपर्कात असताना एप्रिल महिन्यात त्याने पीडितेला रमजान ईदच्या निमित्ताने भेटायला बोलावून घेतले. दरम्यान, त्याच्या आयशर टेम्पो मध्ये त्याने पिडितेवर  बळजबरीने अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. पीडित तरुणीने विरोध केला असता त्याने तिला मारहाण करून पीडितेच्या तोंडात बोळा कोंबून बळजबरी करू लागला, पीडितेने त्याच्या तावडीतून स्वतःची सुटका करून घर गाठले. तिच्यावरील अतीप्रसंगामुळे घाबरलेल्या पीडितेने याबाबत कुटूंबाना काहीही सांगितले नाही.

(हेही वाचा – Water Supply : मुंबईकरांच्या पाण्याची चिंता मिटतेय, तलाव आणि धरणांत १८.७३ टक्के पाणीसाठा)

आरोपी असद हा तीला फोन करून भेटण्यासाठी बोलावू लागला. परंतु, पीडितेने त्याला टाळले व त्याचा फोन घेण्याचे बंद केले. जुन महिण्यात पीडित तरुणी ही मैत्रिणीसोबत फिनिक्स मॉल येथे फिरायला आली असता, त्या ठिकाणी आरोपी असद आला व त्याने तीचा मोबाईल फोन बळजबरीने काढून घेतला. मोबाईल पाहिजे असेल तर माझ्यासोबत यावे लागेल असे बोलून त्याने पीडितेला बळजबरीने टेम्पोत बसवून रात्री १०:३० वाजता सफेद पूल परिसरात आणून पुन्हा तिच्यावर बळजबरीने लैगिंक अत्याचार केला. पीडितेने विरोध केले असता त्याने तीचे केस पकडून डोके टेम्पोच्या दरवाजावर आपटून जखमी केले. “जर तू याबाबत कोणाला सांगितले तर तुला ठार करून मी देखील आत्महत्या करेल” अशी धमकी आरोपी असद यांनी दिली. (Ghatkopar Rape Case)

(हेही वाचा – जळगाव क्रीडा संकुलनाबाबत MLC Satyajeet Tambe यांची सरकारकडे विचारणा)

काही दिवसांपूर्वी पीडित तरुणी बेपत्ता झाल्यामुळे तिच्या कुटूंबियांनी घाटकोपर पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार दाखल केली, त्यावेळी असद ने पीडितेला धमकी देऊन घेऊन गेल्याचे समोर आले. घाटकोपर पोलिसांनी कुर्ला परिसरातून असदला टेम्पो सोबत ताब्यात घेऊन त्याच्या तावडीतून पीडितेची सुटका केली. तसेच पीडितेच्या तक्रारीवरून असद शेख याच्या विरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ११५(२)(मारहाण करणे)३५१ (३) (जीवे मारण्याची धमकी) ,६४ (बलात्कार)६५(२)(ड)(वारंवार बलात्कार करणे) आणि ७४ ( विनयभंग) अनव्ये गुन्हा दाखल करून असद शेख याला अटक करण्यात आले आहे.  (Ghatkopar Rape Case)

हेही पाहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.