Firing : कुख्यात गँगस्टर शरद मोहोळवर गोळीबार

401
कुख्यात गँगस्टर शरद मोहोळ याच्यावर पुण्यातील कोथरूड परिसरात गोळीबार (Firing) करण्यात आला. कोथरूड परिसरातील सुतारदरा या ठिकाणी शरद मोहोळ जात असताना दुचाकीवरून आलेल्या अज्ञात आरोपींनी शरद मोहोळ यांच्या दिशेने तीन गोळ्या झाडल्या. त्यातील एक गोळी शरद मोहोळ त्याच्या खांद्याला लागली.
गंभीर जखमी झालेल्या शरद मोहोळ याच्यावर कोथरूड परिसरातीलच एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. शुक्रवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास हा संपूर्ण प्रकार घडला आहे. गोळ्या झाल्यानंतर (Firing) आरोपी पसार झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच कोथरूड पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. शरद मोहोळ याच्यावर गोळीबार झाल्यामुळे प्रचंड खळबळ उडाली. शरद मोहोळ याच्याविरूध्द अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद पुण्यातील वेगवेगळ्या पोलिस ठाण्यात आहे. दरम्यान, काही गुन्ह्यांमध्ये न्यायालयाने मोहोळ याची निर्दोष मुक्तता देखील केली आहे.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.