Firing : सायन-चुनाभट्टी येथे गोळीबार; गुंड सुमित येरूनकर ठार, तीन जखमी

322

सायन-चुनाभट्टी येथे रविवारी दुपारी सव्वा तीन वाजण्याच्या सुमारास गोळीबाराची घटना घडली. या गोळीबारात गुंड सुमित येरूनकर हा ठार झाला असून तीन जण जखमी झाले आहे. जखमींना उपचारासाठी सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याची माहिती परिमंडळ ६ चे पोलीस उपायुक्त हेमसिंग राजपूत यांनी दिली. या गोळीबाराच्या (Firing) घटनेनंतर चुनाभट्टी परिसरात तणावाचे वातावरण पसरले असून पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे.

या गोळीबारात (Firing) ठार झालेला गुंड सुमित येरूनकर हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर खंडणी, गोळीबार, हत्येचा प्रयत्न यासारख्या गंभीर गुन्ह्याची नोंद आहे. रविवारी दुपारी चुनाभट्टी येथील पाटील गल्ली आणि आझाद गल्ली या ठिकाणी ही गोळीबाराची घटना घडली आहे. सुमित येरूनकरच्या टोळीतून फुटलेल्या गुन्हेगारांनी सुमित आणि त्याच्या साथीदारावर अंधाधुंद गोळीबार केला, दरम्यान सुमित येरूनकर आणि त्याच्या साथीदारांनी प्रतिउत्तर देण्यासाठी गोळीबार केला घटनास्थळी जवळपास १०ते १२ राऊंड फायर करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.येरूनकर याच्यावर हल्ला करण्यासाठी आलेल्या हल्लेखोरांनी हल्ल्यानंतर तेथून पळ काढला.

(हेही वाचा Detonators Seized in Raigad : धक्कादायक; रायगड जिल्ह्यात 1500 किलो जिवंत जिलेटीन आणि 70 किलो डिटोनेटर हस्तगत)

या गोळीबारात सुमित येरूनकरसह चार जण गंभीररीत्या जखमी झाले असून घटनास्थळी दाखल झालेल्या चुनाभट्टी पोलिसांनी जखमींना सायन रुग्णालयात उपचारासाठी आणण्यात आले डॉक्टरांनी सुमित येरूनकर याला तपासून मृत घोषित केले असून तिघांना उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी चुनाभट्टी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून हल्लेखोरांची ओळख पटविण्यात आली असून त्याच्या शोधसाठी पोलिसांचे ९ पथके तयार करण्यात आली असल्याची माहिती पोलीस उपायुक्त हेमसिंग राजपूत यांनी दिली. या गोळीबारात ठार झालेला सुमित येरूनकर हा चुनाभट्टीत आपली टोळी चालवत होता, त्याच्यावर खंडणी,हत्येचा प्रयत्न या सारखे गंभीर गुन्ह्याची नोंद आहे. फेब्रुवारी२०१६मध्ये सुमित येरूनकर याने चुनाभट्टी येथे बांधकाम व्यवसायिक जिग्नेश जैन याच्या कार्यालयात बुरखा परिधान करून गोळीबार केला होता, त्यात जिग्नेश जैन जखमी झाले होते. या गुन्हयात सुमित ला कल्याण मधून मुंबई गुन्हे शाखेने अटक केली होती.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.