दहशतवादाच्या कारवायांमध्ये सहभागी असलेल्या एका पाकिस्तानी २० वर्षीय दहशतवाद्याचे कॅनडातून अमेरिकेत प्रत्यार्पण करण्यात आले आहे. दहशवादविरोधी अमेरकेचे हे मोठे यश मानले जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी (११ जून) कॅनडामध्ये राहणारा पाकिस्तानी नागरिक मोहम्मद शाहजेब खान यांचे कॅनडातून प्रर्त्यापण करण्यात आले. त्याच्यावर ISIS ला मदत करणे आणि दहशतवादी कृत्यांच्या आरोप होता. शाहजेब खान न्यूयॉर्कच्या ब्रुकलिन येथील यहूदी सेंटरवर दहशतवादी हल्ला करण्याचा कट रचत होता अशी माहिती अमेरिकन तपास यंत्रणा FBI च्या हाती लागली. जर हा हल्ला यशस्वी झाला असता तर तो 9/11 नंतरचा अमेरिकतला सर्वात मोठा हल्ला असता असं FBI चीफ काश पटेल यांनी सांगितले. (FBI)
(हेही वाचा – Bengaluru Stampede : तुम्ही आख्ख्या जगाला बोलावलं; कर्नाटक सरकारने फोडले आरसीबीवर खापर)
शाहजेब पाकिस्तानात जन्मला आहे. तो स्टुडेंट व्हिसा (Student visa) घेऊन कॅनडाला गेला. तिथे मिसिसॉगा येथे राहत त्याने ISIS सोबत मिळून अमेरिकेतील यहूदी समुदायाला टार्गेट करण्याची योजना आखली होती. हल्ल्यासाठी त्याने ७ ऑक्टोबर २०२४ ची तारीख निवडली. जी इस्त्रायलने हमासवर केलेल्या हल्ल्याची वर्षपूर्ती होती. ज्यात १२०० लोक मारले गेले होते आणि २०० हून अधिक लोकांचे अपहरण करण्यात आले होते. शाहजेबने उघडपणे म्हटले होते की, या हल्ल्यात इतके लोक मारले असते जो 9/11 नंतरचा सर्वात मोठा हल्ला मानला असता. शाहजेब नोव्हेंबर २०२३ पासून सोशल मिडिया आणि एन्क्रिप्टेड APP च्या माध्यमातून कट्टरपंथी विचारांचा प्रसार करत आहे. तो एक ऑफलाइन दहशतवादी सेल (Offline terrorist cell) बनवू इच्छित होता. त्याने ही योजना यशस्वी करण्यासाठी AR स्टाइल रायफल, सेमी ऑटोमॅटिक शस्त्रेही खरेदी केली होती.
FBI ला जेव्हा त्यांच्या गुप्तहेरांकडून माहिती मिळाली तेव्हा तपास यंत्रणेने शाहजेबच्या हालचालींवर नजर ठेवण्यास सुरुवात केली. अमेरिकन अंडरकवर एजेंटने शाहजेबशी संपर्क साधला. त्याला विना ओळख दाखवता त्याच्याकडून शस्त्रे खरेदी आणि अमेरिकेची सीमा पार करून देण्यासाठी मदत मागितली. जेव्हा FBI ला शाहजेबचा हेतू स्पष्ट झाला, पुरावे सापडले तेव्हा सप्टेंबर २०२४ साली कॅनडाच्या क्यूबेक प्रांतातून त्याला अटक करण्यात आली. हा परिसर अमेरिकेच्या सीमेपासून केवळ २० किमी दूर आहे. अटकेनंतर शाहजेबला कोर्टात हजर केले आणि त्याला अमेरिकेला प्रत्यार्पण करण्यात आले. आता त्याच्यावर पुढील खटला न्यूयॉर्क कोर्टात (New York Court) चालवला जाणार आहे.
(हेही वाचा – भारताशी गद्दारी करणाऱ्या युट्यूबर Jyoti Malhotra चा जामीन अर्ज फेटाळला)
दरम्यान, कॅनडात (Canada) ज्या खोलीत शाहजेब राहत होता, तिथे त्यांचा शांत स्वभाव आणि सामान्य जीवन पाहून कुणालाही तो दहशतवादी कट रचतोय याची भनक लागली नाही. त्याच्या अटकेनंतर आसपासचे लोकही हैराण झाले. शाहजेब याने अमेरिकेत हल्ला करण्यासाठी न्यूयॉर्क हे शहर यासाठी निवडले कारण तिथे सर्वाधिक यहूदी लोक राहतात. त्यामुळे जास्तीत जास्त यहुदींना टार्गेट करण्याचा त्याचा प्लॅन होता. तपासात त्याने अमेरिकेतील 9/11 हल्ल्यानंतरचा हा सर्वात मोठा हल्ला असता इतके लोक मारले गेले असते असं सांगितल्याची माहिती FBI ने दिली.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community