Fake Video Case : अमित शहांच्या बदनामी प्रकरणाशी जिग्नेश मेवाणींचा संबंध? दोन जणांना अटक 

अहमदाबाद सायबर क्राइम ब्रँचने २९ एप्रिल रोजी कलम १५३ ए, १७१ जी, ४६९, ५०५ (२) अंतर्गत एफआयआर नोंदवला होता.

152

सायबर गुन्हे शाखेने मंगळवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या जाहीर सभेचा व्हिडिओची मोडतोड (Fake Video Case) करून तो व्हायरल करणाऱ्या दोन आरोपींना अटक केली आहे. यामध्ये एक आरोपी काँग्रेस आमदार जिग्नेश मेवाणी यांचा पीए आहे, तर दुसरा आम आदमी पक्षाचा (आप) कार्यकर्ता आहे. दोन्ही आरोपींची पोलीस चौकशी करत आहेत. यामुळे आमदार मेवाणी यांचा या प्रकरणाशी संबंध आहे का, याचा तपास पोलीस करू लागले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार अमित शहा यांच्या पालनपूर आणि लिमखेडा येथे आयोजित केलेल्या जाहीर सभेचा व्हिडिओ चुकीच्या पद्धतीने एडिट करून (Fake Video Case) व्हायरल झाला होता. यामध्ये आरक्षणाबाबत चुकीचा प्रचार करण्यात आला. याबाबत तक्रार दाखल करण्यात आली. यानंतर पोलिसांनी सतीश वनसोला आणि आरबी बारिया नावाच्या दोघांना अटक केली. आरोपी सतीश हा काँग्रेस आमदार जिग्नेश मेवाणी यांचा पीए आहे, तर आरबी बारिया हा आपचा कार्यकर्ता आहे.

(हेही वाचा Lok Sabha Election : सोलापुरात भाजपा हॅट्ट्रिक करणार की हुकणार?)

दोघा आरोपींचे फोन जप्त 

डीसीबी सायबर क्राइम लविना सिन्हा यांनी सांगितले की, अहमदाबाद शहर पोलिस आणि सायबर क्राइम ब्रँचमध्ये सोशल मीडिया मॉनिटरिंग सेल आहे. यामध्ये सोशल मीडियावर लक्ष ठेवले जाते. गृहमंत्र्यांचे भाषण चुकीच्या पद्धतीने संपादित करून सोशल मीडियावर व्हायरल झाले. यामध्ये सतीश वनसोला आणि राकेश बारिया या दोन दोघांनी त्यांच्या फेसबुक सोशल मीडिया हँडलवरून हा एडिट केलेला व्हिडिओ व्हायरल केला आहे. या अंतर्गत अहमदाबाद सायबर क्राइम ब्रँचने २९ एप्रिल रोजी कलम १५३ ए, १७१ जी, ४६९, ५०५ (२) अंतर्गत एफआयआर नोंदवला होता. आरोपी सतीश हा मूळचा पालनपूरचा तर दुसरा आरोपी राकेश हा दाहोद येथील लिमखेडा येथील रहिवासी असल्याचे सांगण्यात येत आहे. दोघांचे फोन जप्त करून न्याय वैद्यक चाचणीसाठी पाठवण्यात येणार आहेत.

मेवाणीकडून आरोपीची पाठराखण  

काँग्रेस आमदार जिग्नेश मेवाणी म्हणतात, “मी माझ्या आयुष्यात कधीही बनावट व्हिडिओ (Fake Video Case) किंवा खोट्या प्रचाराचा समर्थक होऊ शकत नाही. मी अशा सर्व कृतींचा निषेध करतो…पण निवडणुकीच्या वेळी निवडकपणे कोणालाही लक्ष्य केले नाही… सतीश माझा भावासारखा आहे आणि मला त्याचा अभिमान आहे. पण तो मुद्दाम वाईट हेतूने काही करणारी व्यक्ती नाही. मी त्याला 6 वर्षांपासून जवळून ओळखतो.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.