ED : बनावट जन्म प्रमाणपत्र घोटाळ्याप्रकरणी नाशिक येथील मालेगावमध्ये (Malegaon) शुक्रवार, २५ एप्रिल रोजी ईडीकडून छापेमारी (ED raid) करण्यात आली आहे. पहाटेपासूनच नाशिकच्या मालेगावमध्ये ईडीचे पथक दाखल झाले असून विविध ठिकाणी छापेमारी करण्यात आली. (ED)
मालेगाव येथे बांग्लादेशी आणि रोहिंग्यांना (Bangladeshis and Rohingyas) भारतीय असल्याचा दाखला दिल्याचा प्रकार भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी उघडकीस आणला होता. त्यानंतर याबाबत विविध तक्रारीही दाखल करण्यात आल्या. तसेच याप्रकरणी पोलिसांनी अनेक ठिकाणी कारवाईही सुरु केली होती.
(हेही वाचा – Bhiwandi मध्ये अग्नितांडव: फर्निचरच्या गोदामाला भीषण आग; आगीच्या कचाट्यात सापडलेली इमारत कोसळली )
दरम्यान, आता आता ईडीनेही याची गंभीर दखल घेत कारवाई सुरु केली आहे. ईडीकडून मनी लॉण्ड्रिंगचा (Money laundering) गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे. बेकायदा जन्म मृत्यू प्रमाणपत्र घोटाळ्याप्रकरणी ईडीने मालेगावमधील एकूण ९ ठिकाणी छापा टाकला आहे.
यावेळी ईडीच्या (ED) एका पथकाने रौनकाबादमधील गल्ली नंबर ७ येथील या गुन्ह्यातील संशयित व महानगरपालिकेचे दुय्यम निबंधक अब्दुल तवाब अब्दुल रज्जाक यांच्या निवासस्थानी छापा टाकला. सदर पथकात तीन पुरुष व एक महिला अधिकाऱ्यांचा समावेश आहे. त्यांनी तवाब यांच्या घरात जाऊन तपासणी सुरुवात केली. सायंकाळी चार वाजेपर्यंत हे पथक त्याच्या घरात ठाण मांडून बसलेले होते. यावेळी घराबाहेर पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता. या तपासणी काळात कोणालाही घरात जाण्यास किंवा घरातन बाहेर पडण्यास मज्जाव करण्यात आलेला होता.
(हेही वाचा – Baluchistan Attack On Pakistan Army : बलुचिस्तानात पाकिस्तानी सैनिकांवर मोठा हल्ला ; २० जणांचा जागीच मृत्यू)
पंचनामा करून अधिकारी मुंबईत परतले
मालेगाव शहरातील रौनकाबाद येथील तवाब यांच्या घरात ईडीच्या पथकाने सकाळपासून संध्याकाळी चार वाजेपर्यंत तपासणी केल्यानंतर पथक मुंबईकडे (Mumbai) रवाना झाले. कारवाईविषयी पथकाच्या अधिकाऱ्यांनी माध्यमांना कोणत्याही प्रकारची अधिकृत माहिती देणे टाळले. पथकाला तवाब यांच्या घरात काही जन्म, मृत्यू दाखले तसेच यासाठी लागणारी कागदपत्र मिळाल्याचे कळते. पंचनामा करून ही कागदपत्र पथकाने ताब्यात घेतली असून, पंचनाम्याची एक प्रत तवाब यांच्या कुटुंबीयांना दिल्याची माहिती माजी आमदार आसिफ शेख यांनी दिली.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community