Drugs In Maharashtra : उडता पंजाबनंतर आता उडता महाराष्ट्र ?

21
Drugs In Maharashtra : उडता पंजाबनंतर आता उडता महाराष्ट्र ?
Drugs In Maharashtra : उडता पंजाबनंतर आता उडता महाराष्ट्र ?

राज्यात सोलापूर, नाशिक, छत्रपती संभाजीनगर आणि आता पालघरमध्ये अमली पदार्थ निर्मितीचे कारखाने असल्याचे समोर आले आहे. (Drugs In Maharashtra) या कारखान्यांतून हजारो कोटींचा माल पोलिसांनी जप्त केला आहे. यावरून आज शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत.

(हेही वाचा – Wagh Bakri Scion Dies : वाघबकरी चहाचे कार्यकारी संचालक पराग देसाई यांचा अपघाती मृत्यू )

उडता पंजाबनंतर आता उडता महाराष्ट्र होत आहे. ड्रग्ज प्रकरणामुळे देशात महाराष्ट्राचे नाव खराब होत आहे. उडता पंजाब नंतर उडता महाराष्ट्र होताना सरकारचे चालले, तरी काय? राज्यात गुन्हेगारी वाढली, कोयता वापर वाढला, ड्रग्ज तस्करी फोफावली, महिला अत्याचार असे अनेक प्रश्न आहे. राज्यात शाळा कमी होऊन दारुची दुकाने वाढत आहेत. याचे उत्तर सरकारने द्यावे, अशी टीका सुप्रिया सुळे यांनी केली आहे. (Drugs In Maharashtra)

महाराष्ट्रातील ललित पाटील ड्रग्ज प्रकरणी मोठी कारवाई होत आहे. पोलीस अनेक शहरांमध्ये धाड टाकून मोठ्या प्रमाणात साठा जप्त करत आहेत. आता कारवाई चालू असली, तरी महाराष्ट्र्रात फोफावलेल्या अमली पदार्थांमुळे चिंता व्यक्त होत आहे.  (Drugs In Maharashtra)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.