Mumbai Police : शेळीपालनाच्या नावाखाली रायगड जिल्ह्यात ड्रग्सची फॅक्टरी, मुंबई पोलिसांकडून कारवाई

Mumbai Police : शेळीपालनाच्या नावाखाली रायगड जिल्ह्यात ड्रग्सची फॅक्टरी, मुंबई पोलिसांकडून कारवाई

138
Mumbai Police : शेळीपालनाच्या नावाखाली रायगड जिल्ह्यात ड्रग्सची फॅक्टरी, मुंबई पोलिसांकडून कारवाई
Mumbai Police : शेळीपालनाच्या नावाखाली रायगड जिल्ह्यात ड्रग्सची फॅक्टरी, मुंबई पोलिसांकडून कारवाई

रायगड जिल्ह्यातील कर्जत येथे भाड्याच्या बंगल्यातून चालवल्या जाणाऱ्या ड्रग्ज कारखान्याचा मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) पर्दाफाश केला. मुंबईतील आरसीएफ पोलिसांनी ही कारवाई केली असून या प्रकरणी सहा जणांना अटक करण्यात आली आहे.अटक करण्यात आलेले आरोपी शेळी आणि पोल्ट्री फार्मच्या नावाखाली लपूनछपून मेफेड्रोन (एमडी) कारखाना चालवत होते अशी माहिती पोलिसांनी (Mumbai Police) दिली आहे.याकारवाईदरम्यान २४.४७ कोटी रुपयांहून अधिक किमतीचे ड्रग्ज आणि कच्चा माल जप्त करण्यात आला आहे अशी माहिती परिमंडळ ६ चे पोलीस उपायुक्त नवनाथ ढवळे यांनी दिली. (Mumbai Police)

हेही वाचा-Pahalgam Attack मधील 26 मृतांचे स्मारक बांधणार ; जम्मू-काश्मीरच्या मंत्रिमंडळाने दिली मंजुरी

रेहान शेख, शिवा गुप्ता, राजन सुब्रमण्यम, शोनू पठाण, अर्कन मेमन अशी अटक करण्यात आलेल्या आरोपीची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी पूर्वी मुंबईतील डोंगरी येथे राहत होते आणि सद्या ते नेरुळ येथे स्थलांतरित झाले होते. त्यांनी कर्जतमधील सौली येथे एक बंगला दरमहा १ लाख या दराने भाड्याने घेतला होता, तो बंगला पशुपालनासाठी असल्याचा दावा करत होता. तथापि, त्या जागेचा वापर मोठ्या प्रमाणात एमडी ड्रग्ज तयार करण्यासाठी केला जात होता. (Mumbai Police)

हेही वाचा- Veer Savarkar : अखंड हिंदुस्थान की अखंड हिंदूराष्ट्र; प्राथमिकता कशाला?

मार्च २०२५ मध्ये पोलिसांनी टोळीतील एका सदस्याला ४५ ग्रॅम एमडीसह अटक केली होती, दरम्यान चौकशीत मुंबई आणि नवी मुंबईतील आणखी चार विक्रेत्यांना अटक करण्यात आली, ज्यांच्याकडून ६.६ किलोग्रॅम ड्रग्ज जप्त करण्यात आले. पुढील चौकशीत कर्जत येथील ड्रग्ज फॅक्टरी अस्तित्वात असल्याचे उघड झाले.तातडीने कारवाई करत, परिमंडळ ६ च्या विशेष पथकाने सौली रिसॉर्ट बंगल्यावर छापा टाकला आणि त्याच्या उत्पादनात वापरल्या जाणाऱ्या रसायनांसह ५.५ किलो एमडी जप्त केले. (Mumbai Police)

हेही वाचा- Veer Savarkar : कृतार्थ मी

अधिकाऱ्यांनी सांगितले की, साइटवरून जप्त केलेल्या १ कोटी रुपयांच्या कच्च्या मालातून १५० किलो एमडी मिळण्याची शक्यता आहे, ज्याची बेकायदेशीर बाजारपेठेत किंमत अंदाजे ३०० कोटी रुपये आहे.डीसीपी (झोन ६) नवनाथ ढवळे यांनी सांगितले की, एमडी रासायनिक प्रक्रियेचा तीव्र वास लपविण्यासाठी आरोपींनी मालमत्तेवर शेळ्या आणि कोंबड्या पाळल्या होत्या, आणि संशय दूर करण्यासाठी प्राण्यांच्या कचऱ्याच्या वासाचा वापर केला होता. (Mumbai Police)

हेही वाचा- Crime News : चार महिन्यात पत्नीकडून पतीची हत्या केल्याच्या ६ घटनांची नोंद , सर्व हत्या विवाहबाह्य सबंधातून

पोलिसांचा अंदाज आहे की गेल्या तीन महिन्यांत, आरोपी दर आठवड्याला सुमारे २५ किलो एमडी बनवत होते. ही टोळी अटक टाळण्यासाठी, दर तीन महिन्यांनी ठिकाणे बदलत होती, कर्जत परिसरात नेहमीच वेगळे बंगले भाड्याने घेत होते. दोन प्रमुख सूत्रधार, एक वडील-मुलगा जोडी, सध्या फरार आहेत. पोलिस त्यांचा कसून शोध घेत आहेत आणि टोळीचे संपूर्ण वितरण नेटवर्क, आर्थिक व्यवहार आणि मोठ्या ड्रग्ज सिंडिकेटशी संबंध असून या प्रकरणी तपास सुरू आहे. (Mumbai Police)

अतिरिक्त पोलिस आयुक्त (पूर्व विभाग) महेश पाटील यांनी या कारवाईच्या व्याप्तीची पुष्टी केली आणि पैशांचा माग आणि रॅकेटशी संबंधित इतर व्यक्तींचा शोध घेण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले. (Mumbai Police)

IMG 20250528 WA0000

“नशा मुक्त गोवंडी अभियान” …….
जानेवारी २०२५ पासून,परिमंडळ ६ “नशा मुक्त गोवंडी अभियान” चालवत आहेत, ज्या अंतर्गत आतापर्यंत ७५ ड्रग्जशी संबंधित प्रकरणे नोंदवण्यात आली आहेत आणि १८.३१ कोटी रुपयांचे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. १९ मार्च २०२५ रोजी, आरसीएफ पोलिस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत असताना, विशेष एएनसी पथकाने ४५ ग्रॅम मेफेड्रोन (एमडी) सह एका व्यक्तीला अटक केली. (Mumbai Police)

त्याच्याविरुद्ध एनडीपीएस कायदा, १९८५ च्या कलम ८(क) आणि २२ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील चौकशी आणि तपासात मुंबई आणि नवी मुंबईतून ड्रग्ज वितरणात सहभागी असलेल्या आणखी पाच जणांना अटक करण्यात आली. १५ मे रोजी, पथकाने आरोपींकडून १३.३७ कोटी रुपये किमतीचा ६.६८९ किलो मेफेड्रोनचा साठा जप्त केला. (Mumbai Police)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.