-
डोंबिवली, प्रतिनिधी
Dombivli शहरातील एका नामांकित बड्या हॉस्पिटलच्या डॉक्टरने १० बिअर पिऊन आणि झोपेच्या ४५ गोळ्या खाऊन आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा प्रकार पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या नोंदीतून समोर आला आहे. हॉस्पिटलमधील नर्सने बोलणे बंद केल्याने भ्रमिष्ट झालेल्या या डॉक्टर महाशयांनी शेवटचे टोक गाठण्याचा प्रयत्न केला, मात्र वेळीच उपचार मिळाल्याने तो असफल ठरला. आता डॉक्टर महाशयांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू असून ते कोमातून बाहेर आल्यानंतर आत्महत्येच्या प्रयत्नांचे कारणे समोर येतील तोपर्यंत तपास यंत्रणांना वाट पहावी लागणार आहे. (Dombivli)
आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या डॉक्टरांची पत्नी देखील डॉक्टर आहे. हॉस्पिटलमधील एका नर्ससोबत प्रेमसंबंध असल्याने डॉक्टर दुसऱ्या घरात राहतात. त्याच घरात त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे पोलिस सूत्रांकडून सांगण्यात आले. डोंबिवली पश्चिमेतील विष्णूनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत एक नामांकित हॉस्पिटल आहे. डॉक्टरांची पत्नी देखील डॉक्टर आहे. डॉक्टर दाम्पत्य हॉस्पिटल चालवितात. दोन दिवस डॉक्टर हॉस्पिटलमध्ये आले नाहीत. त्यामुळे डॉक्टरांना वारंवार फोन करण्यात आले. परंतु डॉक्टरांनी फोन उचलला नाही. हॉस्पिटलमधील कर्मचारी डॉक्टरांच्या घरी गेले. कसेबसे दार उघडले गेले. डॉक्टर बेशूद्ध अवस्थेत जमिनीवर पडलेले आढळून आले. कर्मचाऱ्यांनी तात्काळ उचलून त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल केले. अतिदक्षता विभागात उपचार घेत असलेल्या डॉक्टरांची प्रकृती स्थिर असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. (Dombivli)
(हेही वाचा – Spa Center वर पोलिसांची धाड; घाबरलेल्या तरुणीने तिसऱ्या मजल्यावरून मारली उडी अन्…)
लग्नाचा तगादा लावणाऱ्या नर्सने तोडले बोलणे
या संदर्भास्त पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या डॉक्टरांचे हॉस्पिटलमधील एका नर्ससोबत प्रेमसंबंध जुळले होते. पतीचे बाहेर संबंध असल्याचे लक्षात येताच डॉक्टर पती-पत्नीमध्ये खटके उडू लागले. एकीकडे वारंवार होणारे वाद नको म्हणून डॉक्टरांनी डोंबिवली पूर्वेत असलेल्या एका हायफाय सोसायटीत घर घेऊन राहण्यास सुरूवात केली. तर दुसरीकडे नर्सने डॉक्टरांकडे लग्नासाठी तगादा लावला. माझे लग्न झाले आहे. तुझ्याशी लग्न कसे काय करू? असा डॉक्टरांनी सवाल केला. यावरून नर्सने डॉक्टरांशी बोलणे बंद केले. प्रेयसीने बोलणे बंद केल्याने डॉक्टर व्यथित झाले होते. त्यांच्या मनात प्राणत्याग करण्याचे विचार घोळू लागले. (Dombivli)
(हेही वाचा – T20 World Cup 2026 मधील भारताचे उपांत्य फेरीचे गणित बिघडले; पुढची वाट कशी असणार? वाचा…)
आक्षेपार्ह वस्तू ताब्यात घेऊन तपास सुरू
भ्रमिष्ठ झालेल्या डॉक्टरांनी वाईन शॉपमधून आणलेल्या १० बिअर पोटात रित्या केल्या. त्यानंतर दोन-चार नव्हे तर झोपेच्या तब्बल ४५ गोळ्या खाल्ल्याचे घटनास्थळी पडलेल्या बिअरच्या रिकाम्या बाटल्या आणि गोळ्यांच्या स्ट्रिप्सवरून स्पष्ट झाले. एकीकडे पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून आक्षेपार्ह वस्तू ताब्यात घेऊन तपास सुरू केला आहे. तर दुसरीकडे डॉक्टरांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू असून कोमातून बाहेर आल्यानंतरच डॉक्टरांच्या आत्महत्या करण्यामागचे उद्देश समोर येतील, याकडे तपास यंत्रणांच्या नजरा लागल्या आहेत. (Dombivli)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community

