-
प्रतिनिधी
सहाय्यक पोलीस आयुक्तपदाची पदोन्नती नाकारणे, राज्यातील ७५ वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या चांगलेच अंगलट आले आहे. या ७५ जणांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याचे आदेश गृहविभागाने राज्य पोलीस महासंचालकाना दिले आहे. पोलीस महासंचालकांनी या अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई सुरू केली आहे. पोलीस महासंचालक कार्यालयाने गुरुवारी एक औपचारिक आदेश जारी करून राज्यभरातील संबंधित विभाग प्रमुखांकडून सविस्तर कारवाई अहवाल मागवले आहेत. (Disciplinary Case)
महाराष्ट्र गृह विभागाच्या निर्देशांनंतर ही कारवाई करण्यात आली आहे. ज्या पात्र पोलीस निरीक्षकांना २०२२ ते २०२४ दरम्यान निरीक्षकांना सहाय्यक पोलीस आयुक्त (एसीपी) किंवा पोलिस उपअधीक्षक (डीवायएसपी) पदांवर बढती देण्यासाठी दोन पदोन्नती यादी मंजूर केल्या होत्या. तथापि, मोठ्या संख्येने अधिकाऱ्यांनी पदोन्नती नाकारली. पदोन्नती नाकारणारे ७५ अधिकाऱ्यांची यादी समोर आली आहे. पदोन्नती नाकारणाऱ्या ७५ अधिकाऱ्यांमध्ये मुंबई पोलिसांमध्ये सर्वाधिक २४ अधिकारी आहेत, त्यानंतर ठाणे आणि पुणे पोलिसांमध्ये प्रत्येकी नऊ, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (एसीबी) मध्ये चार आणि पिंपरी-चिंचवडमधील चार आणि विविध जिल्ह्यांमधील इतर अधिकारी आहेत. (Disciplinary Case)
(हेही वाचा – India Tour of England : सर्फराझ खान वडिलांसह कसोटी अजिंक्यपदाचा अंतिम सामना पाहण्यासाठी लॉर्ड्सवर)
आतापर्यंत अनेक अधिकाऱ्यांना असे वाटत होते की पदोन्नती नाकारल्याने कोणतेही परिणाम होणार नाहीत. परंतु पोलीस महासंचालक कार्यालयाने मंगळवार पर्यंत स्थिती अहवाल मागितल्याने संबंधित अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. पोलीस महासंचालक कार्यालयातील आकडेवारी नुसार, गेल्या दोन वर्षांत ५०० हून अधिक वरिष्ठ निरीक्षकांना एसीपी पदावर बढती देण्यात आली, तर २०२५ च्या पदोन्नती यादीत २१५ जणांचा समावेश आहे. तरीही, अनेक अधिकाऱ्यांनी नवीन भूमिका स्वीकारण्यास अनिच्छा दर्शविली आहे. (Disciplinary Case)
सूत्रांचे म्हणणे आहे की, काही अधिकारी, निवृत्तीपूर्वी अनेक वर्षे सेवा शिल्लक असूनही, जाणूनबुजून पदोन्नती नाकारत आहेत. विभागीय चौकशी, सेवा रेकॉर्डमधील प्रतिकूल नोंदी, प्रलंबित सूचना ही कारणे देऊन पदोन्नती नाकारत आहेत. काही अधिकाऱ्यांनी एसीपी पद स्वीकारण्यास त्यांची इच्छा नसल्याचे अधिकृतपणे कळवली आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मते, एक मूलभूत घटक म्हणजे पोलिस ठाणे प्रभारी (वरिष्ठ निरीक्षक) हे पद “क्रिम पोस्टिंग” मानले जाते, ज्यामुळे अनेकजण प्रशासकीय भूमिकांमध्ये बदल करण्यास कचरतात. पदोन्नती पर्यायी नाहीत आणि पालन न केल्यास आता शिस्तभंगाचे परिणाम भोगावे लागतील. येत्या आठवड्यात पुढील चौकशी आणि कारवाई अपेक्षित असल्याचा संदेश पोलीस महासंचालक यांनी दिला आहे. (Disciplinary Case)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community