Dinesh Bobhate : उबाठा नेते अनिल देसाई यांचे स्वीय साहाय्यक बोभाटे यांच्या विरोधात सीबीआयकडून गुन्हा दाखल

Dinesh Bobhate : सीबीआयने दाखल केलेल्या गुन्ह्याच्या आधारावर ईडीकडूनही मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल केला जाण्याची शक्यता आहे. दिनेश बोभाटे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

364
Dinesh Bobhate : उबाठा नेते अनिल देसाई यांचे स्वीय साहाय्यक बोभाटे यांच्या विरोधात सीबीआयकडून गुन्हा दाखल
Dinesh Bobhate : उबाठा नेते अनिल देसाई यांचे स्वीय साहाय्यक बोभाटे यांच्या विरोधात सीबीआयकडून गुन्हा दाखल

शिवसेना उबाठा गटाचे नेते अनिल देसाई यांचे स्वीय साहाय्यक दिनेश बोभाटे (Dinesh Bobhate) आणि त्यांची पत्नी यांच्या विरोधात बेहिशोबी मालमत्ता प्रकरणी सीबीआयने (केंद्रीय अन्वेषण विभाग, CBI) गुन्हा दाखल केला आहे. दिनेश बोभाटे यांच्या विरोधात दाखल झालेल्या गुन्ह्यामुळे देसाई यांची अडचण वाढू शकते, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. एकीकडे रवींद्र वायकर यांची ईडीकडून चौकशी सुरू असतांना देसाई (Anil Desai) यांचे स्वीय साहाय्यक बोभाटे यांच्यावर दाखल झालेल्या गुन्ह्यामुळे शिवसेना उबाठा गटाला मोठा धक्का मानला जात आहे.

(हेही वाचा – CJI Scolds Advocate : हा रेल्वे प्लॅटफॉर्म नाही; सरन्यायाधिशांनी वकिलाला का फटकारले ?)

मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल करण्याची शक्यता

केंद्रीय अन्वेषण विभागाने शिवसेनेचे नेते आणि खासदार अनिल देसाई (Anil Desai) यांचे स्वीय साहाय्यक दिनेश बोभाटे यांच्या विरोधात बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. सीबीआयने दाखल केलेल्या गुन्ह्यावरून ईडीकडून बोभाटे यांच्या विरोधात मनी लॉन्ड्रिंगचा (Money Laundering) गुन्हा दाखल करण्याची शक्यता असून या गुन्ह्याचे धागेदोरे अनिल देसाईपर्यंत जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

२ कोटी ६० लाख रुपयांची बेहिशोबी मालमत्ता कमविल्याचा आरोप

केंद्रीय अन्वेषण विभागाकडून दिनेश बोभाटे यांच्या विरोधात मिळकतीपेक्षा ३६ टक्के बेहिशोबी मालमत्ता कमवल्याचा आरोप दाखल करण्याचे आलेल्या एफआयआरमध्ये करण्यात आला आहे. दिनेश बोभाटे एका विमा कंपनीमध्ये वरिष्ठ साहाय्यक म्हणून कार्यरत होते. या वेळी त्यांनी बेहिशोबी मालमत्ता कमावल्याचा आरोप सीबीआयकडून करण्यात आला आहे. दिनेश बोभाटे यांनी २ कोटी ६० लाख रुपयांची बेहिशोबी मालमत्ता कमविल्याचा आरोप बोभाटे यांच्यावर लावण्यात आला आहे. केंद्रीय अन्वेषण विभागाने दिनेश बोभाटे आणि त्यांची पत्नी देवश्री बोभाटे यांच्या विरोधात १७ जानेवारी रोजी सीबीआयच्या मुंबई कार्यालयात गुन्हा दाखल केला आहे.

(हेही वाचा – Raj Thackeray : रेल्वे भरतीसाठी मराठी तरुणांनी जागरूक राहावे, राज ठाकरे यांचे आवाहन)

दिनेश बोभाटे हे २०१३ ते २०२३च्या कालावधीत एका विमा कंपनीत वरिष्ठ सहाय्यक पदावर कार्यरत होते. या दरम्यान त्यांनी संबंधित विमा कंपनीत टप्प्याटप्प्याने जवळपास ३६ टक्के बेहिशोबी मालमत्ता कमवल्याचा आरोप केंद्रीय अन्वेषण विभागाने केला आहे. केंद्रीय अन्वेषण विभागाकडून बोभाटे दाम्पत्याची चौकशी होणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

सीबीआयने दाखल केलेल्या गुन्ह्याच्या आधारावर ईडीकडूनही मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल केला जाण्याची शक्यता आहे. दिनेश बोभाटे यांच्या अडचणीत वाढ झाली असून बोभाटे (Dinesh Bobhate) हे अनिल देसाई यांचे स्वीय साहाय्यक असल्यामुळे त्यांच्याही अडचणी वाढण्याची शक्यता असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.