Digital Arrest : अंबाजोगाईत एक धक्कादायक घटना उघडकीस आली असून, एका सेवानिवृत्त शिक्षिकेला व्हॉट्सॲप कॉलवरून ‘डिजिटल अरेस्ट’ केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. संबंधित प्रकरणात सेवानिवृत्त शिक्षिकेला मनी लॉन्ड्रींग आणि अतिरेक्यांना फंडिंग केल्याचं सांगत तब्बल ८३ लाख रुपयांना गंडवण्यात आले आहे. दरम्यान चौकशीला सहकार्य करा सांगत फसवणूक करणाऱ्या भामट्यांनी आयपीएस विश्वास नांगरे पाटील (IPS Vishwas Nangre Patil) यांचे नाव घेत ही फसवणूक केली आहे. (Digital Arrest)
(हेही वाचा – Tripura Floods : त्रिपुरात सततच्या पावसामुळे हाहाकार, तब्बल १,३०० कुटुंबांचं स्थलांतरण, मुख्यमंत्री म्हणाले…)
विश्वास नांगरे पाटलांचे नाव सांगत फोन केला
अंबाजोगाई येथील सेवानिवृत्त शिक्षिकेला मनी लॉन्ड्रीग आणि अतिरेक्यांना फंडिंग केल्याचे सांगत चौकशीला सहकार्य करा असे म्हणत व्हॉट्सॲप कॉल वरून तब्बल ८३ लाख रुपये हडपल्याचा प्रकार अंबाजोगाईत झाला आहे. तुमच्या आधार कार्ड वरून दुसरे सिम कार्ड घेतले असून त्याचा दुरुपयोग झाल्याचे देखील बनावट कॉलद्वारे सांगण्यात आले आहे. आम्ही तुम्हाला या प्रकरणातून सोडवू, यासाठी आम्हाला विश्वास नांगरे पाटील यांनी स्पेशल विनंती केल्याच देखील निवृत्त शिक्षिकेला फोन केलेल्या भामट्यांनी सांगितले.
प्लॉट गहाण ठेवून सावकाराकडून घेतले कर्ज
संजय पिसे नावाच्या व्यक्तीने व्हाट्सअप व्हिडिओ कॉल करून आधी या निवृत्त शिक्षिकेला मुंबई पोलिसांचे बनावट ऑफिस, झेंडे, लोगो दाखवून डिजिटल अरेस्ट करण्यात आले. त्यानंतर भीती दाखवून 21 ते 29 मे या दरम्यान तब्बल ८३ लाख १ हजार ८१६ रुपये उकळले. विशेष बाब म्हणजे निवृत्त शिक्षकेने भीतीपोटी सोने प्लॉट गहाण ठेवून त्यावर कर्ज काढत ही रक्कम दिल्याचे सांगितले. ३० मे रोजी गुन्हेगारांनी व्हाट्सअप वरून ब्लॉक केल्यानंतर त्यांना त्यांची फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी सायबर पोलीस ठाणे गाठत फिर्याद दिली त्यानुसार शनिवारी सायबर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास सायबर पोलीस करत आहेत.
(हेही वाचा – dadar railway station : मुंबईकरांच्या गर्दीत सदैव गजबजलेल्या दादर रेल्वे स्टेशनचा इतिहास जाणून घ्या)
फसवणूक झालेल्या शिक्षिकेने भीतीपोटी स्वतःचे सोनं आणि प्लॉट गहाण ठेवून कर्ज घेतलं आणि ती रक्कम भामट्यांना ट्रान्सफर केली. अखेर ३० मे रोजी व्हॉट्सॲपवरून अचानक संपर्क तोडण्यात आला. त्यानंतर फसवणूक लक्षात येताच त्यांनी अंबाजोगाई सायबर पोलिस ठाण्यात धाव घेतली आणि तक्रार दाखल केली. सायबर पोलिसांनी याप्रकरणी शनिवारी गुन्हा दाखल केला असून, अधिक तपास सुरू आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community