-
प्रतिनिधी
छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ टर्मिनल – २ येथील शौचालयात असलेल्या कचरापेटीत नुकतेच जन्मलेले मृत अर्भक सापडले आहे. सहार पोलिसांनी मृत अर्भक पूर्व तपासणीसाठी कूपर रुग्णालय येथे पाठवण्यात आले आहे. याप्रकरणी सहार पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून विमानतळ परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात येत आहे. (Mumbai Airport)
(हेही वाचा – विरोधी पक्षनेतेपदाच्या निवडीबाबत मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांचे सूचक विधान; म्हणाले, अजून काही काळ…)
मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ टर्मिनल – २ येथील शौचालयात मंगळवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास सफाई कर्मचारी साफसफाईचे काम करीत असताना शौचालयात असणाऱ्या कचरापेटीत त्यांना रक्ताने माखलेले एक अर्भक आढळून आले. सफाई कर्मचाऱ्यांनी याची माहिती विमानतळ सुरक्षा रक्षकांना दिली. सुरक्षा रक्षकांनी याबाबत सहार पोलिसांना कळवले असता पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन कचरापेटीतील नवजात अर्भकाचा मृतदेह ताब्यात घेण्यात आला आहे. (Mumbai Airport)
(हेही वाचा – Shrimant Kokate : इतिहासावरील पुस्तके पुराव्यांशिवाय लिहिली; श्रीमंत कोकाटे यांची जाहीर कबुली)
हे अर्भक पुरुष जातीचे असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. मृतदेह कूपर रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला असून पोलिसांनी अज्ञात महिलेविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. शौचालयाच्या कचरापेटीत नवजात अर्भकाचा मृतदेह कोणी टाकला याबाबत तपास सुरू असून पोलिसांकडून टर्मिनल – २ येथील सीसीटीव्ही फुटेज तपासत असून लवकरच हे कृत्य करणाऱ्या व्यक्तीची ओळख पटवून अटक करण्यात येईल अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. (Mumbai Airport)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community