-
प्रतिनिधी
दक्षिण मुंबईतील नागपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत भरदिवसा एका दुचाकीस्वाराला शस्त्राचा धाक दाखवून ३ कोटी किंमतीच्या सोन्याची लूट करण्यात आली. गुरुवारी सकाळी झालेल्या या घटनेने मुंबईतील सोने व्यापाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. याप्रकरणी नागपाडा पोलीस ठाण्यात दोन अज्ञात व्यक्तींविरुद्ध दरोडा टाकल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून एका संशयिताला ताब्यात घेण्यात आले आहे. (Robbery)
(हेही वाचा – Drugs : महागडा ड्रग्ज घेणारे वळले गांजाकडे)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लुटण्यात आलेले सोने काळबादेवी येथील पावसकर ब्रदर्स या सराफाचे होते. गुरुवारी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास दुकानातील दोन कर्मचारी सोने घेऊन एन. एम. जोशी मार्गावर असलेल्या दागिने तयार करणाऱ्या कारखान्यावर दुचाकीवरून निघाले होते. नागपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत असणाऱ्या डायना ब्रिजजवळ पोहोचताच, दुसऱ्या दुचाकीवरुन आलेल्या दोघांनी मागून येऊन त्यांना थांबवले व शस्त्राचा धाक दाखवत सोन्याने भरलेली बॅग हिसकावून घेत कर्मचाऱ्यांच्या दुचाकीची चावी देखील घेतली आणि घटनास्थळावरुन पळ काढला. (Robbery)
(हेही वाचा – ‘Terrorism हा केवळ भारत-पाकिस्तानदरम्यानचा मुद्दा नाही तर…’; भारताचा युरोपियन महासंघाला इशारा)
या घटनेनंतर नागपाडा पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदवला आणि मुंबई गुन्हे शाखेसोबत समांतर तपास सुरु केला. सध्या अनेक पथके पूल आणि आजूबाजूच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज स्कॅन करत आहेत आणि गुन्हेगारांचा शोध घेण्यासाठी गुप्त सूत्रांचाही वापर केला जात आहे. पोलिसांना असा संशय आहे की, दरोडेखोर काळबादेवी येथील कर्मचाऱ्यांचा पाठलाग करत होते. हल्ला करण्यासाठी योग्य क्षणाची वाट पाहत होते. सोन्याची वाहतूक करण्यात सहभागी असलेल्या कर्मचाऱ्यांची संभाव्य भूमिका किंवा निष्काळजीपणा देखील तपासत आहेत. (Robbery)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community