दाऊदचा हस्तक फैसल शेख चालवायचा आर्थर रोड जेलमधून Drugsची टोळी , त्याची रवानगी आता चेन्नई तुरुंगात

50
दाऊदचा हस्तक फैसल शेख चालवायचा आर्थर रोड जेलमधून Drugsची टोळी , त्याची रवानगी आता चेन्नई तुरुंगात
दाऊदचा हस्तक फैसल शेख चालवायचा आर्थर रोड जेलमधून Drugsची टोळी , त्याची रवानगी आता चेन्नई तुरुंगात

मुंबईत सक्रिय असलेल्या संघटित ड्रग्ज (Drugs) तस्करीचे आंतरराष्ट्रीय नेटवर्क विरुद्ध मोठी कारवाई करताना, नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो(NCB)ने आंतरराष्ट्रीय ड्रग्ज तस्कर फैसल जावेद शेख (Faisal Javed) विरुद्ध अमली पदार्थ आणि सायकोट्रॉपिक पदार्थांच्या अवैध वाहतुकीला प्रतिबंध करणारा कायदा १९८८ (पिट) अंतर्गत कारवाई करून त्याची मुंबईतील आर्थर रोड तुरुंगातून चेन्नईच्या पुझल मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.

फैसल जावेद (Faisal Javed) हा मुंबईतील डोंगरी येथे राहणारा असून आर्थर रोड तुरुंगातुन ड्रग्ज तस्करांच्या संपर्कात असल्याच्या संशया वरून त्याचे नेटवर्क तोडण्यासाठी २६ मार्च २०२५ रोजी भारत सरकारच्या संयुक्त सचिवांनी जारी केलेल्या आदेशानंतर, १९ मे २०२५ रोजी फैसल शेख यांची मुंबईतील आर्थर रोड मध्यवर्ती कारागृहातून चेन्नईतील पुझल मध्यवर्ती कारागृहात बदली करण्यात आली. मुंबईतील डोंगरी येथील रहिवासी फैसल जावेदचे आसपासच्या परिसरात बेकायदेशीर ड्रग्ज व्यापारात त्याचे एक मोठे नाव झाले होते. आंतरराष्ट्रीय संघटित गुन्हेगारी टोळ्यासोबत त्याचे खोल संबंध आणि अनेक गुन्हेगारी कटांमध्ये त्याचा सहभाग असल्याने एनसीबीने पीआयटी-एनडीपीएस कायद्यांतर्गत ताब्यात घेतले आहे.

(हेही वाचा – Pakistan Sindh News: पाकिस्तानात गृह युद्ध पेटणार; सिंध प्रांतातील गृहमंत्र्यांच्या घरावर केला हल्ला)

ड्रग्ज तस्करीत सहभागी होता…

मेफेड्रोन आणि कोकेन सारख्या ड्रग्जच्या मोठ्या प्रमाणात तस्करीत तो सहभागी असल्याचे तपासात उघड झाले आहे. आतापर्यंत त्याच्याविरुद्ध एनडीपीएस (NDPS) कायद्यांतर्गत तीन गुन्हे दाखल झाले आहेत. त्याच्या सहभागाशी संबंधित काही मोठ्या जप्ती आहेत. ड्रग्ज (Drugs) तस्करीत सहभागी होता. मेफेड्रोन आणि कोकेन सारख्या ड्रग्जच्या मोठ्या प्रमाणात तस्करीत तो सहभागी असल्याचे तपासात उघड झाले आहे. आतापर्यंत त्याच्याविरुद्ध एनडीपीएस (NDPS) कायद्यांतर्गत तीन गुन्हे दाखल झाले आहेत. त्याच्या सहभागाशी संबंधित काही मोठ्या जप्ती आहेत.२०१७ मध्ये ६८ ग्रॅम मेफेड्रोन, २०२३ मध्ये २० किलोग्रॅम मॅफेड्रोन तर २०२४ मध्ये ९४० ग्रॅम कोकेन त्याच्याकडून जप्त करण्यात आले होते.

कुख्यात तस्कर फैसल विरुद्ध अनेक गुन्हे दाखल आहेत…

फैसल शेख यांच्याविरुद्ध भारतीय दंड संहिता (IPC) आणि (NDPS) कायद्यांतर्गत विविध पोलिस ठाण्यांमध्ये अनेक गुन्हे दाखल आहेत. अंमली पदार्थांच्या तस्करीतून मिळवलेली मालमत्ता जप्त करण्यात आली आहे ज्यामध्ये रोख रक्कम, सोने, चांदी आणि स्थावर मालमत्तांचा समावेश आहे. जप्त केलेल्या मालमत्तेची एकूण किंमत ६.४० कोटी रुपये आहे.

(हेही वाचा – Sanatan Rashtra Shankhnad Mahotsav : राष्ट्राचे रक्षण शस्त्रानेच करावे लागते; मेजर गौरव आर्य यांचे महत्त्वाचे विधान )

आंतरराष्ट्रीय ड्रग्ज सिंडिकेटशी संबंध…

२०२५ मध्ये, मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) फैसलविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (MCOCA), १९९९ देखील लागू केला. गुप्तचर माहितीवरून असेही उघड झाले आहे की फैसलचे आंतरराष्ट्रीय ड्रग्ज (Drugs) सिंडिकेटशी संबंध आहेत, जे राष्ट्रीय सुरक्षा आणि सार्वजनिक आरोग्यासाठी गंभीर धोका निर्माण करतात.

काय आहे पिट एनडीपीएस कायदा …

बेकायदेशीर वाहतूक रोखण्याच्या उद्देशाने काही प्रकरणांमध्ये अटकेची तरतूद करणारा हा कायदा आहे. अंमली पदार्थ आणि सायकोट्रॉपिक पदार्थ आणि त्यांच्याशी संबंधित प्रकरणात हा कायदा वापरला जातो. कारण, अमली पदार्थ आणि सायकोट्रॉपिक पदार्थांची बेकायदेशीर वाहतूक लोकांच्या आरोग्यासाठी आणि कल्याणासाठी गंभीर धोका निर्माण करते. व्यावसायिक प्रमाणात ड्रग्ज (Drugs) असलेल्या गुन्ह्यांसाठी, किमान दहा वर्षांच्या सक्तमजुरीच्या शिक्षेची तरतूद आहे, ही वीस वर्षांपर्यंत वाढवता येते. वारंवार गुन्हे केल्यास दीडपट शिक्षा आणि काही प्रकरणांमध्ये मृत्युदंडाची शिक्षा देखील होऊ शकते.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.