Cyber Crime : सायबर गुन्हेगारांचा फसवणुकीचा नवीन फंडा

अभिनेत्री अंजली पाटील यांची साडेपाच लाखांची ऑनलाइन फसवणूक

266
Cyber Crime : सायबर गुन्हेगारांचा फसवणुकीचा नवीन फंडा
Cyber Crime : सायबर गुन्हेगारांचा फसवणुकीचा नवीन फंडा

तुमच्या पार्सलमध्ये ड्रग्स सापडले आहे, तसेच तूमचे आधार कार्ड मनी लॉंडरिंग प्रकरणात (Money Laundering Case) बँक खात्याशी जोडले गेलेले आहे, असल्याचे सांगून लाखो रुपये उकळण्याची नवीन पद्धत सायबर गुन्हेगारांकडून वापरण्यात येत असल्याचे समोर आले आहे. अशाच एका ऑनलाइन फसवणुकीला एक मराठी अभिनेत्री बळी पडली आहे. या अभिनेत्रीकडून सायबर गुन्हेगारांकडून ५ लाख ७९ हजार ऑनलाइन उकळण्यात आल्याचा प्रकार मुंबईत नुकताच उघडकीस आला आहे. अंधेरीच्या डी. एन. नगर पोलीस ठाण्यात या अभिनेत्रीने तक्रार दाखल केली असून पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. (Cyber Crime)

अंजली पाटील (Anjali Patil) असे या अभिनेत्रीचे नाव आहे. मराठी, हिंदी, तेलगू आणि तामिळ चित्रपटांमध्ये काम करणारी अंजली पाटील ही अभिनेत्री अंधेरी पश्चिम गिलबर्ट हिल रोड येथे राहण्यास आहे. डी. एन. नगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंजली पाटील (Anjali Patil) यांना २८ डिसेंबर रोजी एका अनोळखी मोबाईल क्रमाकांवरून कॉल आला होता, कॉल करणाऱ्या व्यक्तीने स्वतःचे नाव दीपक शर्मा असे सांगून तो ‘फेडएक्स’ या कंपनीचा कर्मचारी असल्याचे सांगितले. तैवान देशात तिच्या नावाने जाणाऱ्या पार्सलमध्ये ड्रग्स मिळून आले असून विमानतळावर कस्टम विभागाने ते पार्सल पकडले आहे. पार्सलमध्ये तिच्या आधारकार्डची प्रत मिळून आल्याचा दावा दीपक शर्मा या कथित कर्मचारी याने अंजली पाटील (Anjali Patil) यांना सांगितले. तसेच तिच्या आधारकार्डचा गैरवापर झाल्याचे सांगून मुंबई सायबर गुन्हे विभागाशी सल्लामसलत करण्याचा सल्ला त्याने अंजली पाटील (Anjali Patil) यांना दिला होता. (Cyber Crime)

(हेही वाचा – Billionaire’s Day Out : मुंबईच्या ‘या’ अब्जाधीशाने केला वेळ वाचवण्यासाठी लोकल ट्रेनने प्रवास )

अशी झाली फसवणूक 

काही वेळाने पाटील यांना ‘स्काईप’द्वारे मुंबई सायबर गुन्हे विभागातील अधिकारी बॅनर्जी असल्याचा दावा करणाऱ्या एका व्यक्तीने कॉल केला, व त्याने तिला सांगितले की तिचे आधार कार्ड मनी लॉंडरिंग प्रकरणात (Money Laundering Case) अडकलेल्या तीन बँक खात्यांशी जोडले गेलेले आहे असे सांगून पुढील पडताळणी प्रक्रियेसाठी ९६ हजार ५२५ रुपयांची प्रोसेसिंग फीची मागणी केली. घाबरलेल्या अंजली पाटील (Anjali Patil) या अभिनेत्रीने तात्काळ जी पे (G Pay) द्वारे ही रक्कम आलेल्या क्रमांकावर पाठवली. स्काईप कॉलवर असलेल्या कथित अधिकारी बॅनर्जी यांने दावा केला की बँक अधिकारी मनी लॉंडरिंग घोटाळ्यात (Money Laundering Case) सामील असू शकतात, पुढील तपासासाठी त्याने ४ लाख ८३ हजार २९१ रुपए पाठविण्याची विनंती केली. कथित अधिकारी बॅनर्जी याच्या सूचनेवरून पाटील यांनी तिच्या अॅक्सिस बँक खात्यातून पंजाब नॅशनल बँक खात्यात ऑनलाइन रक्कम वळती केली. (Cyber Crime)

घडलेला प्रकार अंजली पाटील Anjali Patil) यांनी ती राहत असलेल्या तिच्या घरमालकांच्या कानावर टाकली असता त्याने याबाबत खात्री केली असता अंजली पाटील Anjali Patil) यांची ऑनलाइन फसवणूक झाल्याचे समोर आले. फसवणूक झाल्याचे कळताच अभिनेत्री अंजली पाटील Anjali Patil) यांनी २९ डिसेंबर रोजी अंधेरीच्या डी. एन. नगर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. पोलिसांनी माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या संबंधित कलमांसह भारतीय दंड संहितेच्या कलम ४१९ (फसवणूक), आणि ४२० (फसवणूक आणि अप्रामाणिकपणा) अंतर्गत दोन अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. (Cyber Crime)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.