Suicide News : सीबीआय चौकशीच्या तणावातून सीमाशुल्क अधिकाऱ्याची आत्महत्या

ओळखपत्रावरून मयंक सिंग यांची ओळख पटविण्यात आली.

151
Suicide News : सीबीआय चौकशीच्या तणावातून सीमाशुल्क अधिकाऱ्याची आत्महत्या
Suicide News : सीबीआय चौकशीच्या तणावातून सीमाशुल्क अधिकाऱ्याची आत्महत्या

सीबीआय चौकशीच्या फेऱ्यात अडकलेल्या सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्याने तळोजा कारागृहाजवळ असलेल्या तलावात उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी समोर आली आहे. मयांक सिंग (३८) असे या सीमाशुल्क अधिकाऱ्याचे नाव आहे. खारघर परिसरात राहणारे मयांक सिंग यांचा मृतदेह शुक्रवारी सकाळी नवी मुंबईतील तळोजा कारागृहाजवळ असणाऱ्या तलावात तरंगत असताना खारघर पोलिसांना आढळून आला.

तलावाजवळच त्यांची मोटार उभी होती. ओळखपत्रावरून मयंक सिंग यांची ओळख पटविण्यात आली. खारघर पोलिसांना मयांक सिंग यांच्या मोटारीत एक चिठ्ठी मिळून आली. मात्र, पोलिसांनी या चिठ्ठीतील मजकूराबाबत काहीही उघड केले नसले तरी सीबीआयच्या चौकशीमुळे तणावात येऊन त्यांनी आपले जीवन संपवले असे पोलिसांनी सांगितले. आत्महत्येच्या आदल्या दिवशी सीबीआयने मयांकला चौकशीसाठी बोलावले होते आणि शुक्रवारी पुन्हा चौकशीसाठी समन्स बजावण्यात आले होते.

(हेही वाचा – Crime News : कांदिवलीत वृद्ध पत्नीवर चाकूने हल्ला करून पतीचा आत्महत्येचा प्रयत्न)

१४.५ लाख दंडाची रक्कम न भरता माल सोडण्यासाठी दोन कंपन्यांकडून कथितपणे लाच घेण्यात आल्याच्या प्रकरणाची मयांक सिंगची सीबीआयकडून चौकशी सुरू होती. सिंग यांचा या प्रकरणाशी संबंध असल्याचा आरोप आहे आणि दोन कंपन्यांचीही आरोपी म्हणून नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिंग हे खारघर परिसरात राहत होते आणि त्यांची पत्नी त्यांच्यापासून वेगळे राहत होते. दिल्ली न्यायालयात घटस्फोटाची प्रक्रिया सुरू आहे असे अधिकाऱ्याने सांगितले. आम्हाला कोणतीही तक्रार आल्यास किंवा आम्हाला तपासात त्यांचा छळ करण्यात आला असे आढळून तर आम्ही या प्रकरणी गुन्हा दाखल करू असे एका पोलीस अधिकारी यांनी सांगितले.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.