Customs Department : मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर सीमाशुल्क विभागा(Customs Department)ने मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत जिवंत आणि मृत वन्यजीव प्रजातीचे प्राणी जप्त करण्यात आले असून या प्रकरणी एका भारतीय नागरिकाला अटक करण्यात आली आहे. वन्यजीव संरक्षण कायद्यांतर्गत संबंधित व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, सीमाशुल्क विभागा(Customs Department)कडून या प्रकरणाची पुढील चौकशी करण्यात येत आहे.
( हेही वाचा Japan-China : पूर्व महासागरात जपानने घेतला मोठा निर्णय; F-35 लढाऊ विमानांची कुमक वाढवित दिला चीनला शह )
गुप्त माहितीच्या आधारे, सीमाशुल्क अधिकाऱ्यांनी ३१ मे २०२५ रोजी फ्लाइट क्रमांक टीजी३१७ ने मुंबईत आलेल्या एका प्रवाशाला रोखले. या प्रवाशाच्या तपासणी दरम्यान त्याच्या वर्तनात तो चिंताग्रस्त असल्याचे दिसून आल्यानंतर सीमाशुल्क विभागा(Customs Department)च्या अधिकाऱ्यांकडून या प्रवाशाच्या सामानाची कसून तपासणी करण्यात आली. या तपासणीत ०३ जिवंत साप, ०५ जिवंत कासवे आणि इंडोनेशियन पिट वाइपर प्रजातीचे ४४ साप आढळून आले.(Customs Department)
सीमाशुल्क कायदा, १९६२ च्या तरतुदींनुसार पुढील विविध प्रजातीचे प्राणी आढळून आले आहेत : –
१. स्पायडर टेल्ड हॉर्न्ड वाइपर (स्यूडोसेरास्टेस उराराच्नॉइड्स): ०३ जिवंत साप, जे CITES च्या परिशिष्ट-II आणि नव्याने सुधारित वन्यजीव (संरक्षण) कायदा, १९७२ च्या अनुसूची IV अंतर्गत सूचीबद्ध आहेत.
२. एशियन लिफ टर्टल (सायक्लेमिस डेन्टाटा): ०५ जिवंत कासवे , जे CITES च्या परिशिष्ट-II आणि नव्याने सुधारित वन्यजीव (संरक्षण) कायदा, १९७२ च्या अनुसूची IV अंतर्गत सूचीबद्ध आहेत.
३. इंडोनेशियन पिट वाइपर (ट्रायमेरेसुरस इन्सुलारिस): ४४ साप (४३ जिवंत आणि १ मृत), जे सध्या CITES अंतर्गत सूचीबद्ध नाहीत.
Join Our WhatsApp Community