Crime: मुलुंडमध्ये क्षुल्लक कारणावरून एकाची हत्या, २ अल्पवयीन मारेकऱ्यांना अटक

446
CRIME: कर्नाटकात निवडणुकीपूर्वी पोलिसांची कारवाई, ५ कोटी रोख, 106 किलो दागिने जप्त

मुलुंडमध्ये (Mulund) दिवसाढवळ्या भररस्त्यात झालेल्या एका हत्येच्या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. मारेकरी आणि मृत हे तिघेही अल्पवयीन (juvenile killers) असून ही हत्या क्षुल्लक वादातून झाली असल्याची माहिती मुलुंड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय जोशी यांनी दिली. याप्रकरणी दोन्ही मारेकऱ्यांना अटक (arrested) करण्यात आली असून त्यांच्या विरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे जोशी यांनी सांगितले.

मुलुंड पश्चिम विजय नगर आणि वैशाली नगर येथे राहणारे दोन्ही आरोपी मृत राकेश शुक्ला हे एकमेकांना ओळखत असून आरोपी हे नशा करतात. राकेश शुक्ला (१६) हा सोमवारी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास मुलुंड (प.) डॉ. बाबासाहेब आंबेडकर क्रॉस रोड येथून जात असताना त्या ठिकाणी आरोपी हजर होते. दोघांनी राकेशला थांबवून जुन्या क्षुल्लक वादातून मारेकरीपैकी एकाने राकेशला धारदार हत्याराने भोसकले. राकेश हा रक्ताच्या थारोळ्यात पडताच दोघांनी तेथून पळ काढला.

(हेही वाचा – Maharashtra Public Service Commission: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची प्रतिमा उंचावण्यासाठी जनसंपर्क अधिकारी नेमणार

या घटनेची माहिती मिळताच मुलुंड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमी राकेशला उपचारासाठी नजीकच्या रुग्णालयात आणले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. या प्रकरणी मुलुंड पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून दोन्ही मारेकऱ्यांचा शोध घेऊन दोघांना विजयनगर येथून अटक करण्यात आली. या दोघांनी गुन्ह्यात वापरलेला हत्यार पोलिसांनी जप्त केले असून हे दोन्ही आरोपी अल्पवयीन असून त्यांना मंगळवारी बाल न्यायालयात (Juvenile Courts) हजर करण्यात येईल, अशी माहिती मुलुंड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय जोशी यांनी दिली.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.