आरोपीपर्यंत पोहोचण्यासाठी पोलिसांनी लढवली ‘ही’ शक्कल; ठोकल्या आरोपीला बेड्या

103
सव्वा कोटींचे सोनं घेऊन पळून गेलेल्या एका ज्वेलर्सला अटक करण्यासाठी पोलिसांना ग्राहक बनून स्वतःच्या लग्नाचा बनाव करून ज्वेलर्सपर्यंत पोहचावे लागले. पोलिसांनी या ज्वेलर्सच्या मुसक्या आवळल्या त्याने फसवणूक करून घेतलेल्या सव्वा कोटींच्या दागिन्यांपैकी ७५ लाखांचे दागिने आणि रोकड जप्त करण्यात आली आहे.
झवेरी बाजारातील कल्पतरू ज्वेल प्रा.लिमिटेड या कंपनीकडून २०२१ मध्ये इंदोर येथील व्यापाऱ्याने काही प्रमाणात सोने खरेदी करून कंपनीचा विश्वास संपादन केला होता. त्यानंतर पुन्हा मार्च- एप्रिल २०२१ मध्ये पुन्हा त्याने एक कोटी १३ लाख ७४ हजार रुपये किंमतीचे दागिने आणि सोने क्रेडीडवर खरेदी केले होते. त्यानंतर लॉकडाऊन लागल्यामुळे इंदोरच्या व्यापाऱ्याने सध्या रोकड मिळणार नसल्याचे सांगितले होते. लॉकडाऊन संपल्यानंतर  सोन्याचे पैसे देण्यास तो टाळाटाळ करू लागला.
कंपनीने या व्यापाऱ्याच्या इंदौर येथे त्याच्या घरी आणि दुकानावर शोध घेतला पण तो सापडला नाही. अखेर कंपनीने लोकमान्य टीळक मार्ग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध सुरू केला मात्र तो सापडत नव्हता. पोलिसांनी त्याच्या दुकानावर साध्या वेशात पाळत ठेवूनही तो दुकानावर येत नसल्यामुळे या व्यापाऱ्याची महिती काढण्यासाठी अखेर पोलिसांना त्याच्या दुकानात ग्राहक बनून जावे लागले.
तपास पथकापैकी एका पोलीसाने स्वतःचे लग्न असल्याचे सांगून मोठ्या प्रमाणात दागिने खरेदी करायचे असल्याचे  दुकानातील नोकराला सांगितले आणि पोलिसांनी व्यापाऱ्याच्या दुकानातील मुख्य नोकराचा मोबाईल क्रमांक मिळवला. या नोकराचे मोबाईल कॉल डिटेल्स काढण्यात आले असता व्यापारी दुसऱ्या मोबाईल क्रमांकावरून नोकरांच्या संपर्कात असल्याची माहिती मिळाली. या मोबाईलचे लोकेशन काढले असता व्यापारी त्याच्या मूळ घरापासून काही अंतरावर दुसरे घर घेऊन वास्तव्यास असल्याची माहिती पोलिसांनी मिळाली. पोलिसांनी त्या घरावर धाड टाक व्यापाऱ्याला अटक केली. त्याच्याजवळून पोलिसांनी ७५ लाखांचे सोनं, ४ लाखांची रोकड जप्त केली. तसेच, त्याचे बँक खाते गोठवले  आहे.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.