अकोल्यात ठाकरे गटाच्या उपशहर प्रमुखाची हत्या; चाकू भोसकून खून

121

अकोल्यात ठाकरे गटाचे उपशहर प्रमुख विशाल कपले यांचा चाकूने भोसकून खून करण्यात आला आहे. अकोला शहरातल्या जठारपेठ चौकात त्यांच्यावर रविवारी संध्याकाळी प्राणघातक हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यात ते गंभीररित्या जखमी झाले. त्यांना लगेचच स्थानिकांनी रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. यानंतर शहरात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

( हेही वाचा: ट्वीटरवर आता ब्लू टिक फूकट मिळणार नाही; प्रति महिना मोजावे लागणार ‘इतके’ पैसे )

पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करताहेत

रविवारी संध्याकाळी 7 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. मूळचे मोठी उमरी येथील रहिवासी असलेल्या विशाल कपले यांचा खून झाल्याने खळबळ माजली आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. मात्र, अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. तीन ते चार युवकांनी विशाल कपले यांचा पाठलाग केल्याचे बोलले जात आहे. महाकाली माता मंदिरापासून कपले यांचा पाठलाग करण्यात आला. त्यानंतर जठारपेठ येथील कोरडे हाॅस्पिटल येथील गल्लीत वळताच त्यांच्यावर चाकूने प्राणघातक हल्ला केल्याचे सांगितले जात आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.