Crime News : समाजमाध्यमांवर ‘पाकिस्तान झिंदाबाद’चा मजकुर लिहणाऱ्या खदिजा शेखला पोलिसांकडून अटक !

Crime News : समाजमाध्यमांवर 'पाकिस्तान झिंदाबाद'चा मजकुर लिहणाऱ्या खदिजा शेखला पोलिसांकडून अटक !

158
Crime News : समाजमाध्यमांवर 'पाकिस्तान झिंदाबाद'चा मजकुर लिहणाऱ्या खदिजा शेखला पोलिसांकडून अटक !
Crime News : समाजमाध्यमांवर 'पाकिस्तान झिंदाबाद'चा मजकुर लिहणाऱ्या खदिजा शेखला पोलिसांकडून अटक !

पुण्यात राहणाऱ्या एका तरुणीने इन्स्टाग्राम अकाऊंटवर ‘पाकिस्तान जिंदाबाद’ (Crime News) असे स्टेटस ठेवत भारताविषयी आक्षेपार्ह पोस्ट केली आहे. याप्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खदिजा शहाबुद्दीन शेख (१९, रा. कौसरबाग, कोंढवा) असे गुन्हा दाखल झालेल्या युवतीचे नाव आहे. (Crime News)

हेही वाचा-Fact Check : अफवांचा बाजार उठवणाऱ्या पाकिस्तानचा भारतीय सैन्याकडून पुराव्यांसह पर्दाफाश !

याप्रकरणी पोलीस हवालदार सुभाष महादेव जरांडे यांनी फिर्याद दिली आहे. तिच्यावर भारतीय न्यायसंहिता कलम १५२, १९६, १९७, २९९, ३५२, ३५३ अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. दरम्यान, खदिजा ही सिंहगड इन्स्टिट्यूटमध्ये शिक्षण घेत होती. मात्र या प्रकारानंतर तिला महाविद्यालयाने काढून टाकले आहे. (Crime News)

हेही वाचा- Rahul Gandhi यांचा जामीन रद्द करा ; सात्यकी सावरकरांच्या वकिलांची न्यायालयात मागणी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, युद्धजन्य परिस्थितीत समाज माध्यमात तेढ निर्माण करणारे, तसेच अफवा प्रसारित करणाऱ्या संदेशांवर पोलिसांकडून लक्ष ठेवले जात असल्याचे पोलिस प्रशासनाने यापूर्वीच जाहीर केलेले आहे. शुक्रवारी दुपारी पोलीस कर्मचारी जरांडे हे पोलिस ठाण्यात हजर होते.त्यावेळी संबंधित तरुणीच्या समाजमाध्यमावर पाकिस्तान झिंदाबाद असा मजकूर प्रसारित झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. तिच्या या मजकुरामुळे समाजमाध्यमात तेढ निर्माण होऊ शकते असे लक्षात आल्यानंतर वरिष्ठ पोलिस निरीक्षक विनय पाटणकर यांच्या मार्गदर्शनाखाली तिच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली. (Crime News)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.