आंतरजातीय विवाहाला पित्याचा विरोध! पत्नीसह मुलीवर केला हल्ला

124
आर्थिक गुन्हे शाखेची कारवाई

आंतरजातीय विवाहाला विरोध करणाऱ्या पित्याने मुलीच्या ‘रिंग सिरॅमनी’च्या दिवशीच पत्नी आणि मुलीवर हातोड्याने हल्ला करून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना गुरुवारी पहाटे अंधेरी पश्चिम सात बंगला येथे घडली. या हल्ल्यात आई आणि मुलगी गंभीररित्या जखमी झालेल्या असून त्यांना उपचारासाठी कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी वर्सोवा पोलिसांनी हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून ७९ वर्षीय पित्याला अटक करण्यात आली आहे.

( हेही वाचा : Save Your Phone: उन्हाळ्यात मोबाईल फुटण्याचा अधिक धोका; ‘अशी’ घ्या काळजी)

आंतरजातीय विवाहाला पित्याचा विरोध

प्रभाकर शेट्टी असे अटक करण्यात आलेल्या पित्याचे नाव आहे. प्रभाकर शेट्टी हे पत्नी गीता (६८) मुलगी प्रणिता (३८) सोबत अंधेरी पश्चिम सातबंगला, चेतना इमारत या ठिकाणी राहत होते. प्रभाकर शेट्टी यांचा मुलगा स्कॉटलंड देशात येथे नोकरीला आहे. मुलगी प्रणिता ही नोकरीला असून तिच्यावर कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो.

प्रणिता हिचे दुसऱ्या जातीच्या मुलासोबत प्रेमप्रकरण सुरू होते आणि त्यांनी दोघांनी लग्न करण्याचे ठरवले, मात्र प्रणिताचे पिता प्रभाकर यांना आंतरजातीय विवाह मान्य नव्हता, आईची मात्र लग्नाला संमती होती. बुधवारी प्रणिता आणि प्रियकर निखिल यांचा रिंग सिरॅमनीचा कार्यक्रम मालाड येथील साई पॅलेस मध्ये आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाची पत्रिका छापण्यात आणि होती, परंतु पत्रिकेवर प्रणिताचे वडील प्रभाकर यांचे नाव छापण्यात आले नव्हते कारण त्यांचा या आंतरजातीय विवाहाला विरोध होता.

बुधवारी दुपारी प्रणिता ही आईसोबत रिंग सिरॅमनीला गेली होती. रात्री उशिरा घरी आल्या, दिवसभर दगदग झाल्यामुळे दोघीही दमल्या होत्या, घरी येताच दोघी झोपी गेल्या. पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास प्रभाकर याने गाढ झोपेत असलेल्या पत्नी गीता हिच्या डोक्यात हातोड्याने प्रहार करून दोरीने गळा आवळून हत्या करण्याचा प्रयत्न केला, आईचा आरडाओरड एकूण प्रणिता ही आई वडिलांच्या खोलीत आली व पित्याच्या तावडीतून आईची सुटका करू करीत असताना प्रभाकर याने मुलगी प्रणिता वर चाकूने हल्ला केला.

पोलिसांकडून आरोपीला अटक 

मायलेकींचा आरडाओरडा एकूण शेजाऱ्यांनी शेट्टीच्या घराकडे धाव घेऊन पोलिसांना कळवले. घटनास्थळी दाखल झालेल्या वर्सोवा पोलिसांनी प्रभाकरला ताब्यात घेऊन जखमी मायलेकीला उपचारासाठी कोकिळाबेन रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. या प्रकरणी वर्सोवा पोलिसांनी प्रभाकर शेट्टी यांच्याविरुद्ध हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.

हेही पहा : 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.