-
प्रतिनिधी
मुंबई गुन्हे शाखेच्या कक्ष २ च्या पथकाने मानखुर्द येथे बेकायदेशीर मोबाईल सिम कार्डची विक्री करणाऱ्या ३४ वर्षीय व्यक्तीला अटक केली आहे. युसूफ अली सय्यद असे अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. सय्यद हा कुठलीही अधिकृत कागदपत्रे न घेता ५०० रुपयांना सिम कार्डची विक्री करीत होता. त्याने घुसखोर बांगलादेशी तसेच सायबर गुन्हेगारांना सिम कार्ड विक्री केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला असून त्या अनुषंगाने तपास सुरु असल्याचे गुन्हे शाखेने म्हटले आहे. (Crime)
(हेही वाचा – ‘काँग्रेस खासदाराला पाकिस्तानी गुप्तचर संस्थेकडून प्रशिक्षण’; आसामचे मुख्यमंत्री Himanta Biswa Sarma यांचा खळबळजनक दावा)
अटक करण्यात आलेला युसूफ अली सय्यद हा अँटॉप हिल परिसरात राहणारा आहे. गुन्हे शाखेच्या कक्ष २ ला बेकायदेशीर मोबाईल सिम कार्ड विक्री करणाऱ्या व्यक्तीची माहिती मिळाली होती. कक्ष २ चे अधिकारी आणि पथकाने त्याच्यावर पाळत ठेवून, एक बोगस ग्राहक पाठवून कुठल्याही कागदपत्रांशिवाय सिम कार्ड विक्री करताना युसूफ सय्यद याला सापळा लावून अटक करण्यात आली. (Crime)
(हेही वाचा – Corona पुन्हा आलाय? महानगरपालिका रुग्णालयांमध्ये विशेष खाट आणि विशेष कक्ष)
गुन्हे शाखेने दिलेल्या माहितीनुसार युसूफ सय्यद हा प्रत्येकी सिम कार्ड ५०० रुपयांना विक्री करीत होता. पोलिसांना त्याच्याजवळ १५० सिम कार्ड सापडले आहेत. सय्यदने यापूर्वी शेकडो लोकांना बेकायदेशीरपणे सिम कार्डची विक्री केली असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच भारतात बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी नागरिकांना तसेच सायबर गुन्हेगारांना त्याने सिम कार्ड विकली असावी असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणी सय्यद याच्याविरुद्ध मानखुर्द पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे. (Crime)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community