-
प्रतिनिधी
दक्षिण मुंबईतील एका विशिष्ट समुदायाला कायद्याचा कुठलाही धाक नाही किंवा भीती उरलेली नाही. या समुदायाकडून दक्षिण मुंबईतील पोलीस दलाला लक्ष करण्यात येत आहे. पायधुनी परिसरात असाच काहीसा संतापजनक प्रकार समोर आला आहे. पोलिसांच्या नाकाबंदी दरम्यान मोटारसायकल वरून आलेल्या दोन जणांनी पोलिसांच्या अंगावर मोटारसायकल चढवून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. या घटनेत एक पोलीस अंमलदार जखमी झाला आहे. याप्रकरणी पायधुनी पोलिसांनी तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करून तिघांना अटक केली आहे. (Crime)
मुस्तफा शेबाज पाटका (२४), माविया मुस्तफा शेख (२४) आणि अब्दुल रहमान गफार शेख (२३) हे तिघे मुंबई सेंट्रल, पायधुनी आणि डोंगरी येथे राहणारे आहेत. या तिघांपैकी अब्दुल रहमान हा सराईत गुन्हेगार असून त्याच्या विरुद्ध डोंगरी पोलीस ठाण्यात दोन गंभीर गुन्ह्याची नोंद आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पायधुनी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चिमणी पॉईंट या ठिकाणी पोलीस ठाण्याकडून लावण्यात आलेल्या नाकाबंदी दरम्यान सुसाट वेगाने येणाऱ्या एका मोटारसायकलला पोलिसांनी थांबण्याचा इशारा करून देखील त्यांनी आपली मोटारसायकल न थांबवता नाकाबंदी तोडून मोटारसायकल पोलिसांच्या अंगावर घालण्याचा प्रयत्न केला. (Crime)
(हेही वाचा – MHADA पादर्शकतेच्या मार्गावर; आता टपाल स्वीकारणार नाही तर स्कॅन करणार)
या दरम्यान पोलीस अमलदार कुलाल मोटारसायकलला आडवे आले आणि त्यांनी मोटार सायकल थांबवली असता मोटारसायकलवरील दोघेही पोलीस अंमलदार कुलाल यांच्या अंगावर धावून आले. त्यांची कॉलर पकडून त्यांना दमदाटी करून मारहाण करीत असताना नाकाबंदी वरील इतर पोलीस अधिकारी आणि अंमलदार हे कुलाल यांच्या मदतीसाठी पुढे आले आणि त्यांनी या दोघांना ताब्यात घेऊन कुलाल यांची सुटका केली. हा प्रकार सुरू असताना पाठीमागून आलेल्या मोटर सायकल स्वाराने त्या प्रसंगाचे व्हिडिओ शूटिंग सुरु केले आणि “मारो सालो को, में सब सोशल मीडिया पर डालता हूं इतकी वाट लगा देंगे” असे म्हणाला तेव्हा सदर इसमास ताब्यात घेत असताना त्यांने पोलिसांशी झटापट केली व पोलीस अंमलदार कुलाल यांना दुखापत केली. (Crime)
पायधुनी पोलिसांनी मुस्तफा शेबाज पाटका (२४), माविया मुस्तफा शेख (२४) आणि अब्दुल रहमान गफार शेख (२३) या तिघांना अटक करून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दक्षिण मुंबईतील जेजे मार्ग, जंक्शन, डोंगरी, पायधुनी इत्यादी परिसरातील एका विशिष्ठ समुदायाचे लोकाना कायद्याची भीती नसून वाहतुकीचे नियम मोडून बेफामपणे वाहने चालवून कायदा मोडतात. त्यांना कायद्याची भीती नाही किंवा धाक नाही, त्यांच्यावर गुन्हे दाखल करून देखील त्यांना काहीही फरक पडत नाही असे सेवानिवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त अविनाथ धर्माधिकारी यांनी ‘हिंदुस्थान पोस्ट’ शी बोलताना सांगितले. या लोकांची पोलिसांवर हात उचलायाची, अंगावर धावून यायची हिंमतच कशी होते, या लोकांवर ताकदीचा वापर करण्यात यावा असे धर्माधिकारी यांनी म्हटले आहे. “मी डोंगरी विभागाचा तत्कालीन एसीपी असताना कोरोना काळात काही जणांनी एक व्हिडिओ बनवून “हम डोंगरीके भाई है, पुलीस हमारा कुछ नही बिघाड पाऍंगे, असा व्हिडीओ बनवून त्यांनी सोशल मीडियावर व्हायरल केला होता,आम्ही त्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करून त्यांचा माफी मागतानाचा व्हिडीओ बनवून सोशल मीडियावर टाकला होता. त्यानंतर त्यांनी पुन्हा असे कृत्य केले नाही, अशी एक आठवण सेवानिवृत्त एसीपी धर्माधिकारी यांनी ‘हिंदुस्थान पोस्ट’ शी बोलताना सांगितली. (Crime)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community