Murder : पूर्व द्रुतगती महामार्गावर ओव्हरटेकिंगवरून झालेल्या हत्येप्रकरणी आरोपीला अटक

105
Murder : पूर्व द्रुतगती महामार्गावर ओव्हरटेकिंगवरून झालेल्या हत्येप्रकरणी आरोपीला अटक
  • प्रतिनिधी 

ओव्हरटेक करताना झालेल्या वादातून दुचाकीस्वाराने चारचाकी वाहनचालकाची भोसकून हत्या केल्याची घटना रविवारी दुपारी घाटकोपर पूर्व द्रुतगती महामार्गावर घडली होती. या हत्येनंतर पळून गेलेल्या दुचाकीस्वाराला मुंबई गुन्हे शाखेने गोवंडी शिवाजी नगर येथून अटक करत आरोपीचा ताबा पंतनगर पोलीस ठाण्याकडे देण्यात आले आहे. सूरज जयस्वाल (२२) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. (Murder)

सूरज हा विक्रोळी पूर्व हरियाली व्हिलेज येथे राहणारा आहे. सूरज याचा पनीरचा व्यवसाय असून या व्यवसायासाठी लागणारा चाकू नेहमी त्याच्या दुचाकीच्या डिक्कीत ठेवलेला असतो. मृत झिशान रफिक शेख (३४) हा विक्रोळी येथे राहणारा असून त्याचा जुन्या मोटारी विक्रीचा व्यवसाय होता. झिशान हा रविवारी आपल्या वॅगनआर कारने कुर्ला सीएसटी रोड येथे जाण्यासाठी पूर्व द्रुतगती महामार्गावरील सर्व्हिस रोड येथून जात असताना आरोपी सूरज हा मैत्रिणीसोबत दुचाकीवरून कुर्ल्याच्या दिशेने निघाला होता. (Murder)

(हेही वाचा – Veer Savarkar : ‘वीर सावरकरांचा सैनिकीकरणाबाबतचा सल्ला आज खरा ठरत आहे’; पुरस्कार सोहळ्यात ब्रिगेडियर (नि.) हेमंत महाजन म्हणाले…)

दरम्यान सूरजने जिशानच्या कारला कट मारून ओव्हरटेक करून पुढे जात असताना झिशान हा त्याला ओरडताच सूरज हा पुढे जाऊन थांबला. कट मारून ओव्हरटेक केल्याप्रकरणी झिशानने सूरजला जाब विचारला असता दोघांमध्ये वाद झाला. यावादातून सूरजने दुचाकीच्या डिक्कीत ठेवलेला पनीर कापण्याचा सुरा बाहेर काढून झिशानला भोसकले आणि सूरज हा मैत्रिणीसह दुचाकीवरून पळून गेला. या घटनेत झिशानचा मृत्यू झाला. याप्रकरणी पंतनगर पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध सुरू केला होता. (Murder)

मुंबई गुन्हे शाखेकडून आरोपीचा शोध सुरू असताना गुन्हे शाखा कक्ष ७ च्या पथकाने सोमवारी शिवाजी नगर गोवंडी येथून अटक करण्यात आली. पुढील तपासासाठी गुन्हे शाखेने आरोपीचा ताबा पंतनगर पोलिसांना दिला आहे. पोलीस सूत्रांच्या म्हणण्यानुसार आरोपी सूरज हा तापट स्वभावाचा आहे. ज्या दिवशी घटना घडली त्या दिवशी सूरज हा घरातून भांडण करून मैत्रिणीसोबत निघाला होता. त्याचवेळी झिशानसोबत ओव्हरटेकिंगवरून त्यांच्यात वाद झाला. या वादातून सुरजने झिशानची हत्या केल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. (Murder)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.