Swati Maliwal मारहाण प्रकरणी न्यायालयाने विभव कुमारचा जामीन अर्ज फेटाळला

145
Swati Maliwal मारहाण प्रकरणी न्यायालयाने विभव कुमारचा जामीन अर्ज फेटाळला

आम आदमी पक्षाच्या (Aap) राज्यसभा खासदार स्वाती मालीवाल (MP Swati Maliwal) हल्ल्याप्रकरणी, दिल्लीच्या तीस हजारी न्यायालयाने शुक्रवारी मुख्यमंत्री केजरीवाल (CM Kejriwal) यांचे सहकारी विभव कुमार (Bibhav Kumar) यांचा जामीन अर्ज फेटाळला. न्यायालयाने फेटाळलेली ही दुसरी जामीन याचिका आहे. यापूर्वी २७ मे रोजी त्यांचा पहिला नियमित जामीन अर्ज फेटाळण्यात आला होता. विभव कुमार सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. (Bibhav Kumar)

(हेही वाचा – Pothole : खड्डे आणि दुरूस्‍तीयोग्‍य रस्‍त्‍यांच्‍या तक्रारींसाठी नागरिकांकरता महापालिकेची काय आहे व्यवस्था, जाणून घ्या!)

यापूर्वी २७ मे रोजी विभवचा जामीन अर्ज फेटाळताना अतिरिक्त सत्र न्यायाधीश सुशील अनुज त्यागी म्हणाले होते, ‘पीडितेने केलेले आरोप फेटाळले जाऊ शकत नाहीत. केवळ एफआयआर दाखल करण्यास उशीर केल्याने केसवर फारसा परिणाम होणार नाही कारण ४ दिवसांनंतरही जखमांची वैद्यकीय अहवालात स्पष्ट नोंद आहे. केजरीवाल यांचे स्वीय सहाय्यक विभव कुमार यांनी आम आदमी पक्षाच्या राज्यसभा सदस्य स्वाती मालीवाल यांच्यावर १३ मे २०२४ रोजी मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी मारहाण केल्याचा आरोप केला होता. या प्रकरणात, घटनेच्या दिवशी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाचे काही व्हिडिओ देखील सोशल मीडियावर समोर आले होते, ज्यामध्ये मालीवाल सुरक्षा कर्मचाऱ्यांशी वाद घालताना दिसल्या होत्या, तर दुसऱ्या व्हिडीओमध्ये ते मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून बाहेर पडताना दिसत होते.

(हेही वाचा – Pothole : खड्डे आणि दुरूस्‍तीयोग्‍य रस्‍त्‍यांच्‍या तक्रारींसाठी नागरिकांकरता महापालिकेची काय आहे व्यवस्था, जाणून घ्या!)

या प्रकरणी १६ मे रोजी बिभवविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांतर्गत एफआयआर (Bibhav Kumar FIR) दाखल करण्यात आला होता. दोन दिवसांनंतर १८ मे रोजी त्याला अटक करण्यात आले आणि त्याच दिवशी न्यायदंडाधिकारी न्यायालयाने त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. त्यानंतर २४ मे रोजी त्याला ४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. मात्र, त्यानंतर ३१ मे रोजी न्यायालयाने बिभवला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली असून, तपास अद्याप प्राथमिक अवस्थेत असून तो पूर्ण होण्यास वेळ लागेल. (Bibhav Kumar)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.