लातूर जिल्ह्यातील उदगीर शहरातील शासकीय सामान्य रुग्णालय आणि अन्य तीन ठिकाणी कोविड सेंटर (Corona) कार्यरत केली होती. याच काळातील एक ऑडिओ क्लिप आता समोर आली आहे, ज्यात दोन वैद्यकीय अधिकाऱ्यांमधील संवाद ऐकायला मिळत आहे. ‘कोविड रुग्णाला मारुन टाक’ अशी चिथावणी देणाऱ्या एका वरिष्ठ डॉक्टरचा कथित ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने खळबळ माजली आहे. (Corona)
या प्रकरणात संबंधित डॉक्टरविरोधात लातूर जिल्ह्यातील उदगीर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या क्लिपमध्ये उदगीर शासकीय रुग्णालयाचे अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. शशिकांत देशपांडे आणि कोविड सेंटरवर नियुक्त डॉ. शशिकांत डांगे यांच्यात फोनवर संभाषण झाल्याचे ऐकायला मिळते. डॉ. देशपांडे, नांदेड नाका येथील कोविड सेंटरमध्ये बेड उपलब्ध आहेत का, असे विचारतात. त्यावर डॉ. डांगे नकारात्मक उत्तर देतात. यावर डॉ. देशपांडे म्हणतात, “दायमीच्या पेशंटला मारुन टाक की, कशाला ठेवलेय उगीच? ऑक्सिजन जास्त लागतोय, तुम्हाला… लई पडलंय.” (Corona)
हेही वाचा- वाळू चोरांवर फौजदारी गुन्हे दाखल करा; महसूलमंत्री Chandrashekhar Bawankule यांचे निर्देश
गेल्या काही दिवसांपासून कोरोना रूग्णसंख्येत वाढ होत आहे. मात्र, घाबरण्याचे करण नसल्याचे डॉक्टर सांगत आहेत. अशातच, हे प्रकरण समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे. (Corona)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community